खासदार बजरंग सोनवणे हे आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या 20 मिनिटांपासून त्यांच्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चा सुरू आहे. केजच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे आणि नवनीत कॉवत यांच्यात ही बैठक सुरू आहे. लोकसभेत देखील सोनवणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तसंच कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर बजरंग सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नवीन पोलीस अधीक्षक यांना बीड जिल्ह्याविषयी माहिती सांगितली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्ह्या संदर्भात आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी काय करता येईल त्याबाबतीत प्रयत्न करा, अशा सूचना या भेटीतून कॉवत यांना केल्या आहेत. तसंच जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना केल्या असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची गती समाधानकारक नसल्याचं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.