Sangli police Action On Ex MLA Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: २ बड्या नेत्यांसह ४० जणांविरोधात गुन्हे, राजकीय वर्तुळात खळबळ

Sangli Police: सांगलीमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सांगलीच्या जत पोलिसांनी ही कारवाई केली.

Priya More
  • सांगलीच्या जत शहरात २ माजी आमदारांसह ४० जणांवर गुन्हे

  • जत रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

  • विलासराव जगताप आणि विक्रमसिंह सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

  • जत नामांतर आणि पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते

विजय पाटील, सांगली

सांगलीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीमधील २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगलीच्या जत शहरातील महाराणा प्रताप चौक रस्त्यावर सर्व पक्षीयांकडून आंदोलन करण्यात आले होते. जत तालुक्याचं नामांतर आणि पाण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रास्ता रोको देखील करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जत शहरातील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन आणि सरकारच्या विरोधात भाषणे दिल्याप्रकरणी २ माजी आमदार, २ जिल्हा बँक संचालकांसह ४० जणांविरोधात जत पोलिसांनी कारवाई केली. या सर्वांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रम सिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, आधी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह इतर आंदोलकांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर करत गुन्हे दाखल केले आहेत. जत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार श्रीशैल बिसलाप्पा वळसंग यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २ आमदारांसह ४० जणांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम २२१, १८९ (२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ (३) तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरदार, माजी सभापती सुजय ऊर्फ नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, शिवसेनेचे अमित ऊर्फ बंटी दुधाळ, नगरसेवक संतोष कोळी, माजी नगरसेवक नीलेश बामणे, युवराज निकम, रवींद्र सावंत, अजिंक्य सावंत, राहुल बाबर, महादेव पाटील, ईरण्णा निडोणी, परशुराम सांगोलकर, प्रकाश माने, बाबासाहेब कोडग, विवेक कोकरे, महांतेश पाटील आणि रासप नेते अजित पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card e-KYC Deadline: रेशन कार्डधारकांचे टेन्शन मिटलं, शासनाने e-KYC बाबत घेतला मोठा निर्णय; शेवटची तारीख काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी

Curry Leaves Storage Tips: कढीपत्ता खराब होऊ नये म्हणून करा 'हे' 7 सोपे उपाय; महिनाभर राहील फ्रेश

EPFO Rules Update : PF काढण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल! 'या' अटींना पात्र नसाल तर काढता येणार नाहीत पैसे, जाणून घ्या नवे नियम

Horoscope Nakshatra : आजपासून ‘या’ 3 राशींचे अच्छे दिन! बुध देणार बक्कळ पैसा, अचानक धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT