खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

Narhari Zirwal Controversial Remark Tribal Students Protest Manjari: आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेत. मांजरीत सरकार आणि विद्यार्थ्यांमधील चर्चाही निष्फळ ठरलीये. आंदोलनातून ठोस मार्ग निघत नसताना मंत्री मात्र बेलगाम विधान करताहेत. कोण आहेत हे मंत्री?... त्यांनी नेमकं काय म्हटलंय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट..
Narhari Zirwal controversial statement on tribal students protest in Pune
Narhari Zirwal controversial statement on tribal students protest in Punesaam tv
Published On

भारताला सत्याग्रह, उपोषण आणि आंदोलनांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. याच देशात आंदोलनांच्या आगीतून स्वातंत्र्याची नवी पहाट झाली, अशाच आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची मंत्री नरहरी झिरवळांनी फुकटचे सल्ले देऊन खिल्ली उडवलीये. पुण्याच्या मांजरीमध्ये अन्नत्याग उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तब्बल 5 तास सलग चर्चा झाली. मात्र ती निष्फळ ठरली. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी सांत्वन करायला गेलेले झिरवळ आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय.

मी जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा चोरून खायचो असं बेजबाबदार विधान घटनात्मक पदावर बसलेल्या नरहरी झिरवळांनी केल्यानंतर वाद तर होणारचं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चेष्टा केल्यानंतर विरोधकांनी झिरवळांचे वाभाडे काढलेत.

गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थी आपल्या न्याय हक्कांसाठी उपाशीपोटी न्यायाची वाट पाहतायेत. यातल्या अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडलीये. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरुयेत. चिघळलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्याचं सोडून झिरवळांनी नको ते अकलेचे तारे तोडले. आणि स्वत:ची आंदोलनंही स्टंटबाजीच होती हे सांगायलाही त्यांनी लाज बाळगली नाही. त्यामुळ राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांवर अशा मंत्र्यांकडून तोडगा काढण्याची अपेक्षा कोण करणार.?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com