गिरीश महाजन यांना काँग्रेसकडून पक्षप्रवेशाची ऑफर
गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या ऑफरबाबत केला खुलासा
धुळ्यात गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या ऑफरचा किस्सा सांगितला
भुषण अहिरे, साम प्रतिनिधी
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि राज्यातील दुष्काळीस्थितीवरून विरोधकांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जातोय. त्याचदरम्यान राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी हाती आलीय. खान्देशातील भाजपचे प्रमुख चेहरे आणि संकटमोचकांची भुमिका बजावणाऱ्या गिरीश महाजनांना बाबतची. गिरीश महाजन यांना काँग्रेसनं पक्षात येण्याची ऑफर दिली होती. याचा खुलासा खुद्द महाजन यांनी केलाय.
धुळ्यातील कार्यक्रमावेळी भाषण करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या ऑफरचा किस्सा सांगितलाय. महाजन यांनी त्यांना आलेल्या ऑफर संदर्भात सांगितलं तेव्हा स्टेजवरील मान्यवरांमध्ये एकच हशा पिकला. गिरीश महाजन म्हणाले दाजीसाहेब मला नेहमी म्हणायचे तू काँग्रेसमध्ये येऊन जाऊ, मी दाजींना म्हणालो दाजी आता आमचं पर्व सुरू झालेल आहे. तुम्ही भाजपमध्ये येऊन जा, सध्या कसं सुरू आहे ते आपण बघत आहात सकाळी हा आमदार तिकडे होता आता इकडे कसा, काळ बदलला आहे परिस्थिती बदलली आहे, परंतु दाजींनी जिवंत असेपर्यंत आपला पक्ष सोडला नाही, निष्ठा सोडल्या नाहीत.
कुणाल बाबा आता तुम्ही देखील तसंच करायचं आता तुम्ही ज्या पक्षात आहात तिथेच आपल्याला राहायचं आहे, दुसरा विचार मनात आणू देऊ नका, गिरीश महाजनांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आमच्याकडे बघा मी लहानपणापासून स्वयंसेवक संघामध्ये होतो, विद्यार्थी परिषदेमध्ये गेलो, भाजपामध्ये आलो, आमची त्यामुळे विचारधारा ठरलेली आहे असे देखील मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता उद्योग व्यवसाय देखील करावा कारण सध्या अलनिनोचा प्रभाव तसेच हवामानातील बदल यांचा परिणाम शेतीवर होत असल्याने सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उद्योग व्यवसायात देखील कार्यरत होण्याचे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी आपल्या भाषणातून बोलताना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.