Big Jolt to Congress in Vidarbha Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसला खिंडार; २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Big Jolt to Congress in Vidarbha: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान विदर्भात मोठी राजकीय घडामोड घडली. विदर्भात काँग्रेसला खिंडार पडलं. २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे दिले.

Priya More

Summary -

  • विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला

  • २२१ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

  • उमेदवारी ठरवताना गटबाजी आणि मनमानी झाल्याचा आरोप

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठं खिंडार पडलं

पराग ढोबळे, नागपूर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. नागपूरमध्ये २२१ पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून २२१ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. नगरपंचायत, नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप करत या सर्वांनी राजीनामे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. वाडी पालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नगरपालिका अध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील व्यक्तीला देताना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान आहे. याच कारणावरून २२१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे प्रदेश अध्यक्षांकडे पाठविण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. हे सर्व पदाधिकारी नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची देखील चर्चा होऊ लागली आहे.

काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रसन्ना तिडके यांनी सांगितले की, 'नाना पटोले यांचे समर्थक म्हणून काँग्रेसमध्ये त्रास देण्यात आला. तुमचे नेते असे तसे म्हणत बोलून दाखवण्यात आले. माझ्यावर काँग्रेसमध्ये अन्याय झाला.' काँग्रेसमधील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गटबाजी आणि नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे. ग्रामीण भागात वर्चस्व असणारे सुनील केदार हे एक गट चालवत आहे. मौदा नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी डावलण्यात आले. त्यामुळे अखेर बाहेर पडावे लागले, असा खळबळजनक आरोप प्रसन्ना तिडके यांनी केला आहे.

दरम्यान, प्रसन्न तिडके यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेस टिकवण्यासाठी लढणारे प्रसन्न तिडके आता मौदात कमळ फुलवण्यात यशस्वी होतील का? याकडे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर पूर्ण नियंत्रण असलेले माजी मंत्री आणि माजी आमदार सुनील केदार तसेच त्यांचे समर्थक खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर त्यांनी गटबाजीचे राजकारण केल्याबद्दल आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Leopard Attack : ऑपरेशन लेपर्ड! बिबट्याच्या नसबंदीसाठी वनविभागाची सर्वात मोठी मोहीम, पण 'या' आव्हानांचे काय?

Garlic Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्यावर हार्ट अटॅक ते डायबेटीजचा धोका टळतो, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

Black Coffee vs Milk Coffee: ब्लॅक कॉफी की मिल्क कॉफी, कोणती अधिक फायदेशीर?

SCROLL FOR NEXT