Maharashtra Politics: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?

Local Body Election 2025: रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये बाप-लेक आमनेसामने आले आहेत. वडिलांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला. तर मुलाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
Maharashtra Politcs: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • कोकणामध्ये बाप-लेक आमनेसामने आले आहेत

  • गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत बाप-लेक निवडणुकीच्या रिंगणात उतरले

  • राजेंद्र अर्जुन भागडे (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध त्यांचा मुलगा सौरभ राजेंद्र भागडे (राष्ट्रवादी अजित पवार गट) अशी लढत होणार

  • कोकणातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये बाप-लेकांची चर्चा होत आहे

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अशातच कोकणातील राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बाप-लेक आमने सामने आले आहेत. दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. गुहागर नगरपंचायंतीची निवडणूक हे दोघेजण लढणार आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे. गुहागर नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक -१३ मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून वडील राजेंद्र अर्जुन भागडे हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असून त्यांच्यात विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांचे चिरंजीव सौरभ राजेंद्र भागडे हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण गुहागरवासीयांचे लक्ष लागलं आहे. वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागरमध्ये आकर्षण ठरणार आहे.

Maharashtra Politcs: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?
Kalyan politics : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फटाके; शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप नेत्यांना खोचक सल्ला, नेमकं काय म्हणाले?

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय प्रभाग 5 मधून प्रचाराला सुरुवात झालीय. या प्रभागातून महायुतीकडून सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांना उमेदवारी निच्छित झालीय. तर नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. रत्नागिरीतील कचरा, पर्यटन, स्मार्ट सिटी, रस्ते, पाणी प्रश्न, मोकाट जनावरे असे विविध प्रश्न या निवडणूकीत चर्चेत असणार आहेत.

Maharashtra Politcs: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?
Maharashtra Political News : मावळ पॅटर्नला लोणावळ्यात ब्रेक! भाजपाचा स्वबळाचा निर्णय आणि राष्ट्रवादीचा डाव रंगणार का?

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या ४ नगर परिषद तर गुहागर, देवरूख आणि लांजा अशा ३ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी ५६ तर या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या एकूण १०१ प्रभागांतील १५१ सदस्य पदासाठीच्या निवडणुकीकरीता ६३५ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणूकीसाठी २०० मतदान केंद्र असणार असून एकूण १ लाख ६० हजार ४४८ इतके मतदार आहेत. यामध्ये ८२ हजार ५६२ महिला तर ७७ हजार ८८५ पुरूष मतदारांचा समावेश आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत असून निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Maharashtra Politcs: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?
Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com