छुप्या मार्गे गाईंची तस्करी; आरोपीला विवस्त्र करून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं, नागपूर हादरलं

Cow Smuggling Suspect Publicly Humiliated: गाईंची तस्करी करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली आणि केलं विवस्त्र. आरोपीला विवस्त्र करून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं. वाद निर्माण होण्याची शक्यता.
Cow Smuggling Suspect Publicly Humiliated
Cow Smuggling Suspect Publicly HumiliatedSaam
Published On
Summary
  • नागपुरात गो तस्करी करणाऱ्याला केलं विवस्त्र

  • पवनी भंडारा मार्गे नागपुरात गोतस्करीचं करण्याचा प्रयत्न

  • विवस्त्र केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यातील दिघोरी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाईंची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला विवस्त्र केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पवनी भंडारा मार्गे गोतस्करीचे वाहन घेऊन येणाऱ्या आरोपीला काही गोरक्षकांनी पकडलं. गोरक्षकांनी त्याला पकडून विवस्त्र करून मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यातील दिघोरी परिसरात रविवारी रात्री ११: ३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, पवनी भंडारा मार्गे नागपुरात गोतस्करीचे वाहन घेऊन येणाऱ्याला गोरक्षकांनी अडवलं. हिंदू प्रतिष्ठानचे स्वप्नील साळुंखे आणि काही कार्यकर्त्यांनी गो-तस्करी करणारी गाडी अडवली.

Cow Smuggling Suspect Publicly Humiliated
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

त्यानंतर गोरक्षकांनी आरोपीला हुडकेश्वर पोलीस स्टेशनपर्यंत विवस्त्र अवस्थेत नेलं. विवस्त्र करताना हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. यानंतर हिंदू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत तक्रार दाखल केली. तसेच गो तस्कराला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Cow Smuggling Suspect Publicly Humiliated
रूग्णवाहिकेनं मध्यरात्री घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू, घटना CCTVत कैद

अलिकडेच रविवारी रात्री गोतस्करी करणाऱ्या एका ट्रकला आग लागून ३० जनावरं दगावल्याची घटना घडलीय. त्यामुळे गोतस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं वारंवार समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com