रूग्णवाहिकेनं मध्यरात्री घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू, घटना CCTVत कैद

Four Dead After Ambulance Bursts Into Flames Near Petrol Pump: गुजरातमधील मोडासा परिसरात रूग्णावाहिकेला अचानक आग लागली. आगीत नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू.
Four Dead After Ambulance Bursts Into Flames Near Petrol Pump
Four Dead After Ambulance Bursts Into Flames Near Petrol PumpSaam
Published On

गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रूग्णवाहिकेत जिवंत जळून नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील, एका डॉक्टर आणि एक परिचारिका यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बाळाला अरवलीहून अहमदाबादला नेत असताना हा भीषण अपघात घडला. मोडासातील राणा सय्यदजवळ रूग्णवाहिकेला आग लागली. या आगीत चोघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रूग्णवाहिका नवजात बाळाला घेऊन अरवलीहून अहमदाबादच्या दिशेनं जात होती. यादरम्यान, सोमवारी रात्री उशिरा रूग्णावाहिकेला आग लागली. रूग्णवाहिकेत अचानक आग लागल्यामुळे काही क्षणात भडका उडाला. पेट्रोल पंपाजवळून जात असताना रूग्णावाहिकेनं पेट घेतला. भीषण आगीमुळ रूग्णावाहिकाची राख झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Four Dead After Ambulance Bursts Into Flames Near Petrol Pump
मध्यरात्री लोकलमध्ये डॉक्टरचा पाठलाग; अश्लील हावभाव अन्.. नवी मुंबईतील आरोपीला बेड्या

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने आग विझवली, पण सर्वांचे जीव वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही रूग्णावाहिका अहमदाबादच्या ऑरेंज हॉस्पिटलची असल्याची माहिती आहे.

Four Dead After Ambulance Bursts Into Flames Near Petrol Pump
लोखंडी पाईप, रॉड अन् लाठ्या, भावकीतल्याच लोकांनी ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, बीड पुन्हा हादरलं

रूग्णावाहिकेला आग कशी लागली?

अहमदाबादमधील ऑरेंज हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेत आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्ही ही घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रूग्णवाहिका रस्त्यावर धावत असताना अचानक मोठी स्पार्किंग होते. यानंतर चालक रूग्णावाहिका थांबवतो. मात्र, काही क्षणात रूग्णवाहिका पेट घेते.

या घटनेत रूग्णवाहिकेतील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. नवजात बाळासह तीन जण जिवंत जळाले. तर, काही जण गंभीररिच्या भाजले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com