मध्यरात्री लोकलमध्ये डॉक्टरचा पाठलाग; अश्लील हावभाव अन्.. नवी मुंबईतील आरोपीला बेड्या

Homoeopathy Doctor Harassed at Mulund Railway Station: मुलुंड रेल्वे स्थानकावर भयंकर घडलं. मध्यरात्री २४ वर्षीय महिला डॉक्टरचा लैंगिक छळ. आरोपी अटकेत.
Homoeopathy Doctor Harassed at Mulund Railway Station
Homoeopathy Doctor Harassed at Mulund Railway StationSaam Tv
Published On

मुलुंड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे स्थानकावर एका महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कु्र्ला (जीआरपी) पोलिसांनी एका ३४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा शेअर बाजार व्यापारी म्हणून काम करत असून, नवी मुंबईतील रबाळे परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पाखरे असे आरोपीचे नाव आहे. तर, पीडित महिला होमिओपॅथी डॉक्टर (वय वर्ष २४) ही दादर पश्चिम येथील रहिवासी आहे. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ ते १:१० च्या दरम्यान घडली आहे. पीडित महिला मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ट्रेनची वाट पाहत होती.

Homoeopathy Doctor Harassed at Mulund Railway Station
लोखंडी पाईप, रॉड अन् लाठ्या, भावकीतल्याच लोकांनी ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, बीड पुन्हा हादरलं

आरोपी महेश पाखरे महिलेचा पाठलाग करत होता. तो एकटक महिलेकडे पाहत होता. अश्लील हावभाव करून जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. महिलेनं यानंतर लोकलमधील आलार्म वाजवला. त्यानंतर जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी महेश पाखरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पीडित महिलेनं त्यानंतर कुर्ला जीआरपीकडे तक्रार दाखल केली.

Homoeopathy Doctor Harassed at Mulund Railway Station
ठरलं तर मग! तेजस्वी यादव विरोधी पक्षनेता, आरजेडीच्या बैठकीत मोठा निर्णय

पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कुर्ला जीआरपीने त्याच्याविरूद्ध कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश पाखरे हा शेअर मार्केट ट्रेडर असून, तो नवी मुंबईतील रबाळे परिसरात राहत असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com