Senior leader resigns from Ajit Pawar’s camp in Nashik ahead of local polls; political circles heat up. x
महाराष्ट्र

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होतेय. ज्यामुळे महायुती आघाडीमध्ये तणाव निर्माण झालाय.

Bharat Jadhav

  • नाशिकमध्ये अजितदादांना मोठा राजकीय धक्का बसलाय.

  • बड्या नेत्याच्या राजीनाम्यानं राजकीय वर्तुळात खळबळ वाढलीय.

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी पक्षांतराला वेग आलाय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराचे पेव फुटले आहे. अनेक ठिकाणी पक्ष प्रवेशाचे सोहळा पार पडताना दिसत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीत निवडणुकी लढवण्यासाठी इच्छूक असलेले अनेकजण इकडे तिकडे उड्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना दुसरा उमेदवार शोधण्याचं टेन्शन आलंय. महायुतीमधील तिन्ही पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तिन्ही पक्ष एकमेकांचे नेत्यांना फोडून त्यांना आपल्या पक्षात घेत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिकमध्ये पक्षाला मोठा धक्का बसलाय. नांदेडमध्ये उपनगराध्यक्षांना आपल्या गटात भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये शिवसेनेनं धक्का दिलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.

लोंढे यांचा शिवसेनेतील प्रवेश अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी देखील धक्का मानला जात आहे. कारण नामदेवराव लोंढे हे माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्तीय समजले जातात. याआधी कोकाटे यांचे बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे निकटवर्तीय नेत्यानं त्यांची साथ सोडलीय.

दरम्यान नामदेवराव लोंढे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना मोठी लॉटरी लागलीय. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्यात आलं. त्यांना एबी फॉर्मदेखील देण्यात आला आहे. दरम्यान भगूरनंतर सिन्नरमध्येही शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

SCROLL FOR NEXT