Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष एआयएमआयएम पक्षासोबत युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

  • खासदार चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्ष महाराष्ट्रात AIMIM सोबत युती करणार आहे.

  • महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा पक्षाने केली आहे.

  • दलित-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत शिक्षण व आरोग्याच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार आहे.

Maharashtra : खासदार चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष 'आझाद समाज पक्ष (कांशिराम) महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. या पक्षाचे महाराष्ट्र राज्य केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद उपासक यांनी ही माहिती दिली आहे. आगामी निवडणूक आम्ही एआयएमआयएमसोबत लढवू असे गौरी प्रसाद उपासक यांनी सांगितले.

गौरी प्रसाद म्हणाले, 'आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढवू. आमचे खासदार चंद्रशेखर आझाद यांचा संघर्ष पाहून कोट्यावधी तरुण, दलित आणि मुस्लिम आमच्या आझाद समाज पक्षात सामील होत आहेत. या सर्व गोष्टी पाहता, आम्ही महाराष्ट्रात आमच्या संघटनेच्या ताकदीच्या बळावर निवडणूक लढवू.'

'आम्ही शिक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू. आजकाल शिक्षण खूप महाग आहे. शिक्षण स्वस्त असले पाहिजे यावर आम्ही चर्चा करु. गरिबांना शिक्षण मिळत नाही. आरोग्य संस्थेविषयी बोलायला गेल्यास गरीबांना औषधेही मिळत नाही', असे गौरी प्रसाद उपासक यांनी म्हटले. त्यांनी एआयएमआयएमबाबतच्या युतीसंबंधित माहितीही दिली.

'आमची एआयएमआयएमशी अनौपचारिक चर्चा झाली आहे. जेव्हा औपचारिक चर्चा पूर्ण होईल, तेव्हा आम्ही किती जागा लढवणार आहोत आणि ते किती जागा लढवतील हे आम्ही सांगू. आम्ही एआयएमआयएमशी युती करु शकतो. दलित आणि मुस्लिम हे भाऊ-भाऊ आहेत, हा संदेश आम्हाला देशात पोहोचवायचा आहे. ओबीसी आमचे भाऊ आहेत. काही जातीय पक्ष जाती आणि धर्माच्या नावाखाली आपल्या देशाचे विभाजन करु इच्छितात', असे आझाद समाज पक्ष (कांशिराम) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य केंद्रीय प्रभारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bharat Jadhav- Mahesh Manjrekar: भरत जाधव अन् महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, नवीन नाटकाचा प्रयोग कधी?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

SCROLL FOR NEXT