Eknath Shinde and Raj Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'लाचारी'वरून 'राज'कारण तापलं! एकनाथ शिंदेंचा नेता ठाकरेंवर भडकला

Bharat Gogawale attacks Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Nandkumar Joshi

  • राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

  • शिंदेंचा जवळचा नेता घायाळ

  • ठाकरेंवर डागली तोफ

  • महाविकास आघाडी चालते का? नेत्याचा सवाल

सचिन कदम, रायगड | साम टीव्ही

एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी लाचारी करत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. ती टीका शिंदेंचे जवळचे मानले जाणारे नेते भरत गोगावले यांच्या जिव्हारी लागली आहे. राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गोगावलेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलात ही सत्तेसाठी लाचारी नाही का, असा थेट सवालही त्यांनी केला.

शिंदेंचे नेते आक्रमक

मनसेचा पदाधिकारी मेळावा काल, गुरुवारी मुंबईत झाला. या मेळाव्यात ईव्हीएमवर व्होटचोरी कशी होते, याचा डेमो दाखवण्यात आला होता. या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली असतानाच, एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री करा म्हणून सत्तेसाठी किती लाचारी करायची, अशी टीका राज ठाकरे यांनी शिंदेंवर केली होती. या टीकेवरून शिंदेंचे शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री आणि शिवसेना नेते गोगावले यांनीही राज ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

'उद्धव ठाकरेंसोबत जाताय ही लाचारीच'

एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे सत्तेसाठी लाचारी करत असल्याचे राज म्हणाले होते. त्यावर बाळासाहेबांसोबत बडवे आहेत असे म्हणून तुम्ही शिवसेना सोडली होती, मग आता त्यांच्यासोबतच जात आहात ही सत्तेसाठीच लाचारी आहे, असे गोगावले म्हणाले.

महाविकास आघाडी चालते का?

शिंदेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना गोगावलेंनी सवालही केला. जे कालपर्यंत, एकमेकांवर टीका करत होते ती महाविकास आघाडी तुम्हाला चालते का, असा प्रश्न गोगावलेंनी विचारला. दोन्ही भाऊ एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे; पण याचा अर्थ तुमचे हात आभाळाला पोहोचले असा घेऊ नका, असा सल्लाही गोगावलेंनी ठाकरेंना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

LPG Cylinder Price :एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, तुमच्या शहरात दर किती? वाचा

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT