

नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडले
उदय सांगळे आणि रामदास चारोस्कर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
भाजपचे ऑपरेशन लोटस नाशिक जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडणार आहे. अनेक बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून लवकरच ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे हे पक्षाची साथ सोडणार असून भाजपमध्ये जाणार आहेत. तर दिंडोरीमध्ये देखील मविआला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार रामदार चारोस्कर पत्निसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे हे पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते येत्या ४ ते ५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना यामध्ये १ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. या निवडणुकीत उदय सांगेळ यांनी महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजप स्वबळावर लढेल अशी चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात देखील भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश आले आहे. भाजपने याठिकाणी महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर आणि माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची पक्ष प्रवेशाची तारीख देखील ठरली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.