Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी आमदाराने सोडली साथ; अजित पवारांच्या पक्षात जाणार

Political Shift in Hinganghat: वर्धामध्ये शरद पवार गटाला मोठं खिंडार पडले आहे. शरद पवार गटाच्या माजी आमदाराने पक्षाची साथ सोडली आहे. ते गुरूवारी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे वर्धात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.

Priya More

Summary -

  • शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला.

  • माजी आमदार राजू तिमांडे यांनी साथ सोडली.

  • गुरुवारी ते अजित पवार गटात प्रवेश करणार.

  • हिंगणघाटचे राजकारण आता बदलण्याची शक्यता.

चेतन व्यास, वर्धा

आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक जवळचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत आहेत. अशामध्ये वर्ध्यात शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. माजी आमदार राजू तिमांडे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. हिंगणघाटच्या निखाडे मंगल कार्यालयात कार्यकर्तासह ते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने उमेदवारी न दिल्याने राजू तिमांडे नाराज होते. शरद पवारांनी तिकीट न दिल्यामुळे विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. या नाराजीतूनच त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. गुरूवारी अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्धामध्ये ते आढावा बैठक घेत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीनंतर हिंगणघाट येथील बाजार समितीच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यानच राजू तिमांडे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अजित पवार हे वर्धामध्ये सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असून हिंगणघाट येथे माजी आमदार राजू तिमांडे यांचा पक्ष प्रवेश सुद्धा होणार आहे. सकाळपासूनच कामाची सुरवात करणारे मंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. त्याच पद्धतीने ते वर्धेत येणार असून सकाळी ८ वाजताच अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. अजित पवारंच्या बैठकीच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.

महाराष्ट्रातील क्रमांक एकची बाजार समिती म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या बाजारसमितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना येथे अमलात आणल्या आहे. या बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरूवारी दुपारी १२ वाजता हिंगणघाट येथे होणार आहे. त्यापूर्वी हिंगणघाट येथील निखाडे सभागृहात माजी आमदार राजू तिमांडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

राजू तिमांडे हे शरद पवार गटात होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढावली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजू तिमांडे हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. यामुळे हिंगणघाटचे राजकारण काहिसे फिरलेले दिसणार आहे. हिंगणघाटमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : सिंधुदुर्गात महायुतीचा जल्लोष, ढोल ताशा- डीजे लावत गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद

Makeup Remove Tips: फक्त फेसवॉश नाही; मेकअप काढताना ही ट्रिक वापर, चेहऱ्याला होणार नाही कोणता त्रास

Mahashivratri 2026 : महाशिवरात्री उपवासासाठी बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी फुड

High Cholesterol: कोलेस्टेरॉल वाढण्याच्या महिनाभरआधी दिसतात ही 5 गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध अन्यथा पडेल महागात

Pune Mayor Election: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड, RPI चे परशुराम वाडेकर उपमहापौर

SCROLL FOR NEXT