
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीय. अशातच नाशिकमधील पालकमंत्री पदावरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय. 7 महिन्यांपूर्वी रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. हा वाद थेट भाजपच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत म्हणजेच दिल्लीपर्यंत गेलाय. आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमिवर नाशिकच्या पालकमंत्रीपदाला महत्व आहे. अशातच धुळ्यातील एका कार्यक्रमात गिरीश महाजनांनी नाशिकचा पालकमंत्री मीच होणार, असा दावा केलाय. त्यामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटलयं.
दुसरीकडे नाशिकचं पालकमंत्री पद आमच्या पक्षाला मिळायला हवं, अशी आग्रही मागणी मंत्री छगन भुजबळांनी केलीय.
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजनांना दिल्यानं शिंदेसेनेतील दादा भुसेंनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याचीही चर्चा आहे. महायुतीसह इतर पक्षांची नाशिक जिल्ह्यात नेमकी किती ताकद आहे.. पाहूयात..
नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 7 आमदार आहेत. भाजपचे 5 आमदार, शिंदेसेनेचे 2 आमदार तर AIMIM चा एक आमदार आहे. तसचं नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे तीन मंत्री आहेत. याशिवाय शिंदेसेनेचा एक मंत्री आहे. त्यामुळे पक्षीय ताकद अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचं पाहायला मिळतयं.
दरम्यान वक्तव्यानंतर वाद झाल्यावर महाजनांनी सारवासारव केली आहे. मी पक्षात सर्वात सीनियर माणूस आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.