Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

Election Commission update : निवडणूक आयोगाने राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी काय प्रत्युत्तर देतील, हे पाहावे लागेल.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi Saam tv
Published On

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत मोठं भाष्य केलं आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि मतदारयादीत घोळ झाल्याचा आरोप निराधार आणि खोटा असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. त्यांच्याजवळ पुरावे असतील, तर ७ दिवसांत शपथपत्रासहित द्यावेत अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी लागेल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Rahul Gandhi News
Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की, 'मतदारयादीत सुधारणा असेल. परंतु बिहारमध्ये बूथ पातळीवर अधिकाऱ्यांनी बूथ पातळीवर एजंट आणि राजकीय पक्षांसोबत मिळून काम केलं'.

Rahul Gandhi News
Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे म्हटलं की, 'पीपीटी दाखवली, त्यात आकडेवारी नव्हती. चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे. कोणत्या महिलाने दोनदा मतदान केल्याचा आरोप गंभीर आहे. शपथपत्राविना आरोप केल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही. ही बाब संविधान आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात असेल'.

Rahul Gandhi News
Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

राहुल गांधी यांचं नाव न घेता म्हटलं की, 'माझ्या सर्व मतदारांना दोषी ठरवणे आणि निवडणूक आयोग मौन बाळगेल? हे कदापी शक्य होणार नाही. त्यांना शपथपत्र द्यावे लागेल. अन्यथा देशाची माफी मागावी लागेल. यात तिसरा पर्याय नाही. आता सात दिसवांत शपथपत्र सादर करावेत, अन्यथा सर्व आरोप निराधार आहेत. त्यांनी माफी मागायला हवी'.

Rahul Gandhi News
Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

'भारतात ६० टक्क्यांहून अधिक होते. जगातील सर्वात मोठी मतदारयादी आपल्याजवळ आहे. भारताजवळ जवळपास ९०-१०० कोटी लोकांची मतदारयादी आहे. सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज आहे. सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. एका व्यक्तीने दोन वेळा मतदान करणे हा कायदेशीर अपराध आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com