Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Pune Accident News : पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. वर्षश्राद्धाला जाताना तिघांवर काळाने घाला घातला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
Pune accident News
Pune accident Saam tv
Published On

पुण्यात अपघातांची मालिका सुरु आहे. पुण्यातील शिरूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. शिरूरच्या अष्टविनायक महामार्गावर ट्रक आणि दूध गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दूध गाडीचा भीषण अपघात झाला. दूध गाडीने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दूध गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला.

Pune accident News
Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

कवठे गावाजवळील कुटुंबातील वर्षश्राद्धाच्य कार्यक्रमासाठी येत असताना बाप लेकासह वयोवृद्ध आजीचा अपघातात दुदैवी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर वाजे,युवांश वाजे आणि शांताबाई वाजे असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

नेमकं अपघात कसा घडला?

मुंबईवरुन पारनेर तालुक्यातील वडनेर येथे दूध गाडीतून प्रवास करत कुटुंबातील वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी जाताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अष्टविनायक महामार्गावर कवठे येथे रस्त्यावर ट्रक उभा असताना भरधाव वेगात आलेल्या दूध गाडीने ट्रकला अचानक धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, यावेळी दूधगाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेल्या बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर आजीला उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला.

Pune accident News
Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

अपघात इतका भीषण होता की दूधगाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com