Maharashtra Political News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप-शिंदे युतीत मिठाचा खडा? भाजपच्या 'त्या' रणनितीमुळे शिंदे गटात अस्वस्थता

Maharashtra Political News: भाजपने शिंदे यांच्या समर्थक १३ खासदारांच्या मतदारसंघांत देखील आपली तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: राज्यात गेल्या १० महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद घेतलं. दरम्यान, आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना राज्यातील आगामी निवडणुका एकत्रित लढवणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, भाजपने शिंदे यांच्या समर्थक १३ खासदारांच्या मतदारसंघांत देखील आपली तयारी सुरू केल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील संयोजक नेमले असल्याची माहिती आहे. आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे तर शिर्डीत विखे पाटील यांना संयोजक म्हणून जवाबदारी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटावर हे भाजपचे दबावतंत्र तर नाही ना? अशी कुचबूज सुरू झाली आहे. (Breaking Marathi News)

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील? याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यामुळे हा मतदार संघ कोणाकडे आहे, याचा विचार न करता तयारी करा. जागावाटपात पुढे काय होईल, ते नंतर ठरणार आहे. परंतु आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे म्हणून काही करण्याची गरज नाही, असे अजिबात समजू नका, असे निर्देश भाजपकडून खालपर्यंतच्या यंत्रणेला दिले गेल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे भाजप इतकी संघटनात्मक रचनानाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागणार आहे. म्हणूनच भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील संयोजक नेमले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपच्या या कृतीमुळे शिंदे-भाजप युतीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना? अशीही चर्चा आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, एकीकडे भाजपने ही तयारी सुरू केली असताना दुसरीकडे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना शिंदे खासदारांची नुकतीच बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना ४८ पैकी २२ जागा लढवणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT