Congress MP Balu Dhanorkar Passed Away: बाळू धानोरकर यांच्या निधनाने शोक अनावर; राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

सोशल मीडियावर व्यक्त होत बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Congress MP Balu Dhanorkar Passed Away
Congress MP Balu Dhanorkar Passed AwaySaam TV

Balu Dhanorkar Death News : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४८ वर्षांत त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी माध्यमांसमोर येत आणि सोशल मीडियावर व्यक्त होत बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Latets Political News)

"सकाळी धक्कादायक वृत्त समोर आलं. धानोरकर साहेब गेले यावर विश्वास बसत नाही. गेल्या वेळी निवडणुकीत जागा वाटप सुरू असताना आम्हाला भेटले होते. त्यांना तिथे उमेदवारी हवी होती. वास्तविक एवढी जबरदस्त २०१९ लाट असताना काँग्रेस एक ही जागा आली नाही पण ते निवडून आले, असं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Congress MP Balu Dhanorkar Passed Away
Jejuri येथील शिष्ठमंडळ Ajit Pawar यांच्या भेटीला, चक्री उपोषणाचा आज चौथा दिवस

धानोरकरांविषयी बोलताना अजित पवारांनी आपली एक आठवण सांगत म्हटलं आहे की, " मी विरोधी पक्ष नेते पद स्वीकारल्यावर धानोरकर त्या भागात गेले. अवकाळी पाऊस झाला तेव्हा त्यांनी स्वत: पहाणी केली. त्याचां स्वभाव मनमिळावू होता. चंद्रपूरात राष्ट्रवादी कार्यालय नव्हते त्यावेळी ते म्हणाले माझं कार्यालय देतो. मित्र पक्षाला आपले कार्यालय बांधायला देणारे धानोरकर साहेब होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. देवाने त्यांच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची ताकद द्यावी, असं अजित पवार म्हणाले.

यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, चंद्रपूर वरोरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एक तरुण, तडफदार आणि लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या अतीव दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती."

Congress MP Balu Dhanorkar Passed Away
Pune Crime News: संतापजनक! २० वर्षीय तरुणीवर वस्तीगृहातील कर्मचाऱ्याकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी...

राहुल गांधींनी फेसबूक पोस्ट करत लिहिलं आहे की, "महाराष्ट्रातील चंद्रपूरचे खासदार आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते श्री सुरेश नारायण धानोरकर यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा धानोरकर आणि संपूर्ण शोलेकुल परिवाराप्रती मी भावपूर्ण शोक व्यक्त करतो. ते कायम आमच्या आठवणीत जिवंत राहतील."

"काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे.", असं मत अशोक चव्हानांनी व्यक्त केलं आहे.

खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्‍यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत अशोक चव्हानांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे खासदार व माझे संसदेतील सहकारी बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते बरे होतील अशी आशा होती परंतु ते शक्य झाले नाही. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर व कुटुंबियांसोबत आहेत, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उदयनराजेंनी वाहिली आदरांजली

खासदार उदयनराजे भाेसले यांनीही खासदार धानाेरकर यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करुन चंद्रपूरचे तरुण खासदार आणि आमचे जिवलग मित्र बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे असे म्हटलं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. हा तरुण लोकनेता वयाच्या 48 व्या वर्षी आपल्यातून निघून गेला हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com