Nagesh Patil Ashtikar responds strongly to rumours of meeting Eknath Shinde amid growing political buzz in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, ठाकरेंचे खासदार शिंदे गटात जाणार का? गैरहजर खासदाराने मोजक्या शब्दात सांगितलं

Nagesh Ashtikar Denies Meeting With Shinde Camp: महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात जाणार का यावर चर्चा रंगली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत फुटीच्या शक्यतेला फेटाळलं आहे.

Omkar Sonawane

ठाकरे सेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून मातोश्रीवरील बैठकींचा सिलसिला सुरूच आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत सहभाग घेतला. तसेच आज रात्री १० वाजता होणाऱ्या पुढील बैठकीलाही ते ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना आष्टीकर यांनी ठाम भूमिका मांडली.“शिंदे साहेबांची भेट झाली असे कोणी म्हणत असेल तर त्यांनीच ते सिद्ध करावं, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या राजकीय बदलांची शक्यता फेटाळून लावत, आमच्यासोबत काहीही होणार नाही, आणि पुढेही काही होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार नागेश आष्टीकर नेमके काय म्हणाले?

शिंदे साहेबांची भेट झाली असे म्हणणाऱ्यांनी पुरावा द्यावा.

आम्हाला घेण्याची कोणाला गरज नाही.

ऑपरेशन टायगरची चर्चा करणाऱ्यांनीच प्रश्नांची उत्तरं द्यावीत.

गुपित असल्याचं सांगणाऱ्यांनी नावं जाहीर करावीत.

मातोश्रीवर बैठका वाढल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावलं. मातोश्रीवर नेहमीच बैठका होत असतात, यात काही नवीन नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पाठबळाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, निवडणूक ही मतदानाची प्रक्रिया आहे. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांकडे जाऊ शकतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संदर्भात बोलताना ते मोठे नेते आहेत, पण अंतिम निर्णय मतदारच घेणार, असंही त्यांनी नमूद केलं. एकूणच ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेतील हालचालींना वेग आला असतानाच, आष्टीकर यांनी कोणत्याही प्रकारच्या फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT