Accident : एसटी बस कार अन् दुचाकीचा विचित्र अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा

Jalgaon Accident, ST Bus Crash : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावर एसटी बस, कार आणि दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Jalgaon triple vehicle accident latest news
Jalgaon triple vehicle accident latest newsSaam TV marathi
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Jalgaon triple vehicle accident latest news : जळगावमध्ये एसटी बस, कार आणि दुचाकीचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमळनेर-धुळे रस्त्यावर आज सकाळी सात वाजता ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून पुढील तपास केला जात आहे.

जळगावमधील अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावानजीक हॉटेल वृंदावनजवळ आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. एसटी बस, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या या अपघातात ६ जण जागीच ठार झाले. या अपगातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jalgaon triple vehicle accident latest news
शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर गोळीबार! दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; महाराष्ट्र हादरला

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस, कार आणि एक मोटरसायकल ही तिन्ही वाहने अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने जात होती. याच वेळी समोरून (धुळ्याकडून) येणाऱ्या गुजरात पासिंग कारने (GJ 19 AF 3147) या तिन्ही वाहनांना समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि धरणगाव येथील रहिवासी असलेले दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तसेच कारमधील महिला आणि पुरुषांसह एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Jalgaon triple vehicle accident latest news
Weather Update : दिलासादायक! मॉन्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, २६ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'

स्थानिक आणि पोलिसांची मदतकार्य

अपघातानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. एक लहान मुलगा कारमध्येच अडकून पडला होता, तर एसटी बसमधील प्रवासीही जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला आणि इतर जखमींना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी गुजरात येथील व्यारा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Jalgaon triple vehicle accident latest news
Accident : ट्रकला मिनी बसची जोरात धडक, भीषण अपघातात ७ भारतीयांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com