Nagar Parishad and Nagar Panchayat Polls  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Election: निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना मोठा दिलासा, निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत वाढवली

Nagar Parishad and Nagar Panchayat Polls: महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचारासाठीची वेळ वाढवण्यात आली आहे. आता १ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत प्रचार करता येणार आहे.

Priya More

Summary -

  • राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला

  • निवडणुकीच्या प्रचारासाठी १ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली

  • उमेदवारांना आता १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी

  • अपक्ष आणि उशिरा चिन्ह मिळालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आता १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. यापूर्वी ३० नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस सांगण्यात आला होता. पण आता उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद आणि नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता १ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी वाढवला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद आणि नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार आहे. तर प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावा.

अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळाला होता. चिन्ह वाटप सुद्धा उशिरा झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४८ दशलक्ष रोजगार अन् ४.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक; हरित अर्थव्यवस्थेमुळे भारतातील तरुणांना नोकऱ्यांची सुवर्णसंधी

निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाहीच, ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, कोर्टाकडून महत्त्वाचे निर्देश

Kiara-Sidharth: आमच्या बाळाचं नाव काय? सिद्धार्थ कियाराने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

Garuda Purana: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसू लागतात हे संकेत; गरूड पुराणात सांगितली महत्त्वाची माहिती

Kalyan : संतापजनक! शिवीगाळ केली, धमकी दिली, कारागृहात कैद्याचा हवालदारावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT