Rahul Gandhi Press Conference: निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका, पत्रकार परिषदेत दाव्यांचा अन् प्रश्नांचा भडीमार

Rahul Gandhi Questions On Maharahtra Election Result: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारसंख्येतील वाढ आणि मतदानाच्या आकडेवारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Rahul Gandhi Press Conference with supriya sule and sajay raut
Rahul Gandhi Press Conference with supriya sule and sajay rautSaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीत महायुतील मिळालेल्या घवघवीत यशा नंतर यावर विरोधी पक्षाने थेट EVM वर अनेक गंभीर आरोप केले होते. विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला. यावरून राज्यासह देशभरात कलगितुरा सुरू होता. त्याच पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरव्यांसाह निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहे.या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी ईव्हीएममध्ये कशाप्रकारे फेरफार झाला, मतदार अचानक कसे वा़ढले याबद्दल सविस्तर माहिती दिली .

Rahul Gandhi Press Conference with supriya sule and sajay raut
Rahul Gandhi : ५ महिन्यात महाराष्ट्रात ७० लाख नवीन मतदार, लोकसभेत राहुल गांधींनी उपस्थित केला मुद्दा | Video

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील आम्हाला काही माहिती मिळाली आहे. आम्ही त्यावर सविस्तर अभ्यास केला. मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला. त्यात अनेक तफावत दिसून आली. तरुण मुलं मुली लोकशाहीवर विश्वास ठेवतात. सरकारने निवडणुकीसाठी एक समिती गठित केली होती. त्यात चीफ जस्टीस असायचे. त्यांना काढून भाजपच्या माणसाला घेतले. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त बदलले गेले.

महाराष्ट्राची लोकसंख्या 9 कोटी 54 लाख असताना मतदान अधिक कसे?

या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्या इतके मतदार वाढले आहे असा आरोप करत खा.राहुल गांधीनी थेट मतदान प्रक्रियेत वाढलेली आकडेवारीच जाहीर केली.महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे वाढले. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख आहे,मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले? निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कोठून आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे? असे अनेक प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले.

निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नाही तर ती निवडणूक आयोगाची

ज्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली ते दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत. आम्ही याबाबत अनेक वेळा निवडणूक आयोगाला विचारलं. पण त्यांनी आजपर्यंत आम्हाला उत्तर दिलेलं नाही. मी सर्व डेटा निवडणूक आयोगाला स्वाधीन केला आहे. मी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विचारत आहे की हे अधिकचे मतदार वाढलेचं कसं. निवडणुकीत स्पष्टता ठेवण्याची जबाबदारी आमची नाही.तर ती तुमची म्हणजेच निवडणूक आयोगाची आहे.असे अनेक एक ना अनेक सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Press Conference with supriya sule and sajay raut
Delhi Election: दिल्लीत यंदा कोण जिंकणार? आणखी दोन एक्झिट पोलचा अंदाज चक्रावणारा

आमचे मत महाराष्ट्रात कमी झाले नाही

लोकसभा निवडणुकी दरम्यान कोंग्रेस पक्षाला १.३४ लाख मते मिळाली. तेथे आम्ही जिंकलो. विधानसभेत देखील तेवढीच मते आम्हाला मिळाली. विधानसभेत भाजपला १.१९ लाख मिळतात. या मतदारसंघात ३५ हजार नवीन मतदार कोठून आणि कसे वाढतात. हे सर्व अधिकचे मते भाजपच्या खात्यात जमा होतात आणि भाजपचा विजय होतो. हे फक्त एक उदाहरण आहे. असे महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहे. आमचे मत महाराष्ट्रात कमी झाले नाही. भाजपचे मतं अचानक वाढली आहेत. हे मतदार कुठे वाढले आहे जिथे भाजपचा स्ट्राईक रेट ९ टक्क्याहून अधिक आहे. इतिहासात स्ट्राईक रेट ९ टक्क्यापेक्षा अधिक नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावी

आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही. आम्ही आरोप केले पाहिजे. पण आम्ही आरोप करत नाही. फक्त आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने द्यावी अशी मागणी आम्ही वारंवार करतोय. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह यादी द्यावी. निवडणूक आयोग आम्हाला यादी देत नाही. त्यांची ही जबाबदारी आहे. लोकसभा आणि विधानसभेची यादी आम्हाला द्यावी,असे राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com