
2020 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीमध्ये दिल्लीकरांनी 'आपला' पुन्हा एकहाती सत्ता दिली होती.त्यावेळी आपचा 62 जागी विजय झाला होता.तर भाजपला फक्त 8 जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर कॉँग्रेसला सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील खाते उघडता आले नव्हते.त्यावेळी एक्झिट पोल हे पूर्णपणे आपची सत्ता येणार असे आकडे दर्शवत होते.
यंदाच्या दिल्ली निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली.निवडणुकीच्या आधीपासूनच दोन्ही पक्षांमध्ये मोठे वादळ निर्माण झाले होते.अरविंद केजरीवाल ही जेलमधून बाहेर येताच त्यांनी स्पष्ट केले होते की आम्ही आता थेट जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. तर दुसरीकडे भाजप 'आप'नेत्यांवर मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत होती.अशा अनेक आरोप प्रत्यारोपांच्या झडतीमध्ये ही निवडणूक पार पडली.
8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे.यादरम्यान निवडणूक झाल्यानंतर टूडेज चाणक्य एक्झिट पोल्सने आणि एक्सिस इंडियाने चक्रवणारे अंदाज व्यक्त केले आहेत.या दोन्ही एक्झिट पोल्सचे पारडे भाजपच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल लागणार आहे.
एकूण जागा 70
मतदार 1 कोटी 56 लाख
मतदान केंद्र 13 हजार 766
एकूण उमेदवार 699
टूडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 19 जागा तर भाजपला 51 जागा आणि इतर पक्षांना 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.याशिवाय ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले तर त्यातही भाजप सरकार बनवताना दिसत आहे. पोलनुसार दिल्लीत भाजपला 45-55 जागा मिळतील तर आम आदमी पार्टीला केवळ 15-25 जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.