BJP Leader Begging: भाजप नेते भीक मागताना दिसले, फोटो व्हायरल होताच चर्चेला उधाण

Indrajit Sinha BJP Leader Crisis: इंद्रजित सिन्हा हे एकेकाळी भाजपमध्ये आरोग्य सेवा कक्षाचे संयोजक होते. मात्र, आता त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
BJP Leader
BJP LeaderSaam Tv News
Published On

पश्चिम बंगालमधील एका भाजप नेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते रस्त्यावर भीक मागताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक वाटी आहे. ज्यामध्ये ते लोकांना भीक देण्याची विनंती करत आहेत. एक असा काळ होता, जेव्हा आरोग्य विभागात त्याचं मोठं नाव होतं. पण आज त्यांचा उदरनिर्वाह भीक मागण्यावर होत आहे.

पश्चिम बंगालच्या राजकारणात एकेकाळी मोठा प्रभाव असलेले इंद्रजित सिन्हा बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ स्मशानभूमीत भीक मागताना दिसले. 'बुलेट दा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंद्रजित सिन्हा यांचा आजारी अवस्थेतील फोटो व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.

इंद्रजित सिन्हा हे एकेकाळी भाजपमध्ये आरोग्य सेवा कक्षातील संयोजक होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांच्या सल्ल्यानुसार, इंद्रजित यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तसेच जनतेसाठी अहोरात्र काम केलं. मात्र, दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत आहेत. सुरूवातीला ट्युमर आढळला, नंतर कर्करोगाने ग्रस्त असल्याचं आढळून आलं. इंद्रजित सिन्हा अविवाहित असून, त्यांच्या पालकांचे आधीच निधन झाले आहे. त्यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला होता. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आजारपणामुळे आता ते पक्षासाठी काम करू शकत नाहीत.

BJP Leader
Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर

आज तक बांगला या वेबसाईटला माहिती देताना सिन्हा म्हणाले, 'लोकांना मदत करताना स्वत: कर्जात बुडालो आहे. मी पक्षासाठी अहोरात्र काम केलं. कोणत्याही आजारासाठी पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांना रूग्णालयात दाखल करून, त्यांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिलं. पार्टीचे कार्यक्रम आयोजित करता करता मी कर्जात बुडालोय. म्हणून आज स्वत: वर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मला भीक मागावी लागत आहे', असं सिन्हा म्हणाले.

BJP Leader
Income Tax Raid Satara: रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चुलत भावांच्या घरी आयकर विभागाचा छापा

भाजप अध्यक्ष मुजुमदार यांनी दिले मदतीचे आश्वासन

इंद्रजित यांची बिकट परिस्थितीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार यांनी मदतीचा हात पुढे केलाय. तसेच सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर केला. 'इंद्रजित सिन्हा हे भारतीय जनता पक्षातील एक मेहनती आणि ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत. भाजप अध्यक्ष या नात्यानं मी बीरभूम जिल्हा नेतृत्वाला त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देतो. तसेच भाजप पक्षाचे संपूर्ण कुटुंब नेहमीच त्यांच्यासोबत आहे', असं सुकांता मुजुमदार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com