बारामतीमधील २ प्रभागातील निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या.
उमेदवारी अर्जातील तांत्रिक बाबींवरून दोन अर्ज नामंजूर झाल्यामुळे वाद निर्माण झाला.
भाजप उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले गेले.
नगराध्यक्ष पदासह इतर सर्व जागांची निवडणूक मात्र नियोजित वेळेनुसार होणार आहे.
मंगेश कचरे, साम टीव्ही प्रतिनिधी
Why Baramati municipal elections are postponed in two wards : राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेय. सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडालाय. पण बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिढा निर्माण झालाय. त्यामुळे दोन प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांवरील निवडणुका होणार आहे. बारामती नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत २ प्रभागाच्याच निवडणुका पुढे का ढकलल्या? याबाबत जाणून घेऊयात...
प्रत्येक निवडणुकीत बारामतीची चर्चा असतेच. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही आता बारामतीची चर्चा होतोय. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकींमध्ये यंदा मोठा तिढा निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र, नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांच्या निवडणुका पूर्व निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत. उमेदवारी अर्जातील तांत्रिक त्रुटींवरून वाद निर्माण झाल्याने सुधारित आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्रभाग क्रमांक 13 (ब) व प्रभाग क्रमांक 17 (अ) या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जाच्या स्वीकृतीवर तांत्रिक बाबी वरून अर्ज नामंजूर करण्यात आले होते. मात्र यानंतर भाजपचे सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयात यावर सुनवाणी झाली. त्यानंतर हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता बारामतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.