Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Latest Mukhyamantri Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाचा संघर्ष चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे आणि अजित पवार यांनी योजनेवर दावा ठोकताच निवडणुकीत या लाडकीची मतं कोणाच्या बाजूला झुकतील हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin YojanaSaam TV Marathi News
Published On

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून महायुतीतच पेटलेला संघर्ष काही थांबायला तयार नाही....मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भिडल्यानंतर आता पंकजा मुंडे आणि अजितदादांनीही या योजनेवर दावा ठोकलाय. त्यामुळे आता लाडकी ताईची की दादांची यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

राज्यात निवडणुकांचा हंगाम आला आणि सत्ता मिळवण्याचा संघर्ष सुरु झाला. राज्यात झालेल्या अनेक नैसर्गिक अनैसर्गिक युती आघाडीत सत्ता मिळवण्यासाठी आता विधानसभेत जादू करणाऱ्या लाडक्या बहिणाला आपल्याकडे वळवण्याची जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये लाडकीवरुन जुंपलेली असतांना आता थेट पंकजाताईंनी लाडकी बहीण योजनेवर दावा ठोकलाय..तर तिजोरीच्या किल्ल्या हातात असलेल्या दादांनीही लाडकीसाठी खर्चाचा हिशोबच मांडला....

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Gautam Gambhir : रोगापेक्षा इलाज भयंकर, टीम इंडियाची अवस्था इतकी 'गंभीर' का झाली?

विधानसभा निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींमुळे राज्यात न भूतो न भविष्याती असं यश सत्ताधाऱ्यांना मिळालं. यामुळे राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या ताणाकडे दुर्लेक्ष करुनही राज्यात लाडकीचे लाड सुरुयेत. त्यात आता नगरपरिषदांच्या निवडणुकीत याच लाडकीची मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतच श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू झाल्याचं दिसतंय. मात्र लाडकी निवडणुकीत कुणाचे लाड पुरवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Beed : बीडचे बिहार झाले! राष्ट्रवादीच्या नेत्यावर १५ जणांचा हल्ला; कार फोडली, बेदम मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com