Uday Samant Saam Tv
महाराष्ट्र

Uday Samant: मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Maharashtra Political News: शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ते नागपूरवरून गडचिरोलीला जात होते.

Priya More
  • उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

  • गडचिरोलीला जाताना उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

  • उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने अनर्थ टळला

  • नागपूरवरून गडचिरोलीला जाताना घडली घटना

सूरज मसूरकर, मुंबई

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. नागपूरवरून गडचिरोलीला जात असताना ही घटना घडली. उड्डाण करताच तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. उदय सामंत हे गडचिरोलीत पाहणी दौरा करण्यासाठी निघाले होते. या घटेनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टर गुरूवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला. उदय सामंत नागपूरवरून गडचिरोली येथील सुरजागड येथे पहाणी दौरा करणार होते. हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आला होता. त्यामुळे पायलटने उड्डाण थांबवलं यामुळे मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीत बिघाड लक्षात का आला नाही? याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक शिवसैनिकांनी केली.

हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर उदय सामंत यांच्या गडचिरोली दौऱ्याला उशिर झाला. या घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी सांगितले की, सकाळी पावणे नऊ वाजता मी नागपूरवरून सूरजागडच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी निघालो होतो. हेलिकॉप्टर स्टार्ट केल्यानंतर टेक ऑफ घेताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. पायलटने वेळीच लक्ष दिल्याने आणि निर्णय घेतल्यामुळे आम्ही टेक ऑफच घेतला नाही. आम्ही आता बायरोड गडचिरोलीला जात आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT