Uday Samant: माझं वजन दाखवण्यासाठी CM–DCM ना बोलावलं नाही उदय सामंतांचे विधान|VIDEO

Uday Samant Statement On CM–DCM: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजापूरातील सभेत म्हटले की, माझं राजकीय वजन दाखवण्यासाठी मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना बोलावलं नाही.

राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जवाहर चौकात भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला आमदार किरण सामंत, भाजप नेत्या शिल्पा मराठे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत बोलताना उदय सामंत यांनी महायुतीचा पॅनल राजापूरमध्ये निश्चित विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राजापूर नगरपालिकेला कुठलाही निधी कमी पडणार नाही. सभेदरम्यान मशिदीमधून अजान सुरू असतानाही त्यांनी भाषण पुढे सुरू ठेवले. माझं वजन दाखवण्यासाठी मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना राजापूरात भाषणाला बोलावलं नाही. ते राजापूरवासीयांच्या सोबत आहेत हे दाखवणं गरजेचं होतं. असे उदय सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com