सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Saudi Helicopter Crash: सौदी अरेबियातील रास तानूरा येथे सौदी अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला.
Saudi Helicopter Crash:
Saudi Helicopter Crash:
Published On

सौदी अरेबियातील 'रास तानुरा' येथे सौदी अरामकोचे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्दैवी अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि त्याबाबत तपास सुरू आहे. जगातील आघाडीच्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या 'सौदी अरामको'चे (Saudi Aramco) एक हेलिकॉप्टर 'रास तानुरा' (Ras Tanura) भागात कोसळले. सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत पावलेले सर्वजण स्थानिक नागरिक होते.

Saudi Helicopter Crash:
Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना फ्लाइटचा मागील भाग धावपट्टीला धडकला

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अपघात

हा भीषण अपघात सौदी अरेबियाच्या पूर्व किनारपट्टीवरील 'रास तानुरा' भागात झाला. हा भाग मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेस स्थित आहेत. 'रास तानुरा' हे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे तेल रिफायनरी केंद्र मानले जाते आणि त्याचे संचालन खुद्द 'सौदी अरामको'द्वारे केले जाते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरही याच कंपनीचे होते आणि ते नियमित कार्यवाही चालू असताना हा अपघात झाला.

Saudi Helicopter Crash:
Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद

अपघात का आणि कशामुळे झाला? तपास सुरू

हेलिकॉप्टर अपघात कशामुळे झाला आणि त्यामागचे कारण काय यांबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, संबंधित विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सौदी अरामकोने आखातातील आपल्या 'रास तानुरा' टर्मिनलवर जवळपास चार महिन्यांनंतर कच्च्या तेलाच्या लोडिंगचे कामकाज पुन्हा सुरू केले होते, त्याच वेळी ही घटना घडली. जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायूची निर्यात वाढवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या भीषण अपघातामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com