राज्यात १० हाय व्होलटेज लढती
बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला
कोण जिंकले, कोणाचा पराभव?
राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. या महापालिका निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील १० हाय व्होलटेज लढतींमध्ये कोणी बाजी मारली ते जाणून घ्या.
तेजस्वी घोसाळकर विजयी
दहिसर प्रभाग दोन मधून भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा पराभव झाला आहे.
समाधान सरवणकर आणि त्यांची बहीण पराभूत
माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी दोघांचाही पराभव झाला आहे. समाधान सरवणकर यांचा पराभव झाला असून ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी झाले आहे.
माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी पराभूत
माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी वैशाली शेवाळे यांचा पराभव झाला आहे. त्यांनी महायुतीच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
रवींद्र वायकरांची लेक पराभूत
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना धक्का बसला आहे. होम ग्राउंडवरच मुलगी दिप्ती वायकर यांचा पराभव झाला आहे. त्यांनी वॉर्ड क्रमांक 73 मधून निवडणूक लढवली होती.या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या लिना रावत यांचा विजय झाला आहे.
गुलाबराव देवकरांचा मुलगा विजयी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव प्रफुल्ल देवकर यांची पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांनी १०९६ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांचा पराभव केला आहे.
रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली ठोंबरे पाटील यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु पुण्यातील प्रभाग २५ मध्ये मशीन बदलल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. मशीनचा नंबर मॅच होत नसल्याने रुपाली ठोंबरे आक्रमक झालया आहेत.
सुधाकर बुडगुजर
नाशिकच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी झाल्या आहेत. भाजपचे सुधाकर बडगुजर यांचा 14864 मतांनी विजय झाला आहे.
नवनाथ बन
मानखुर्दमधून भाजपचे उमेदार नवनाथ बन हे विजयी झाले. नवनाथ बन हे प्रभाग क्रमांक १३५ मधून निवडणूक लढवली होती.
नवाब मलिकांचे भाऊ
नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक प्रभाग क्रमांक १६५ लढवली होती. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.