Municipal Elections Result
Municipal Elections Resultsaam tv

Municipal Elections Result: पुण्यात मतमोजणी केंद्रावर गोंधळ, EVM मशीन बदलल्याचा ठोंबरेंचा आरोप, पोलिसांसोबत अरेरावी

Chaos at vote counting center Pune municipal elections: पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाला. रूपाली ठोंबरे यांनी आरोप केला की, मतमोजणीदरम्यान ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्यात.
Published on

पुण्यातील महापालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २५ च्या मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांनी मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन बदलल्याचा गंभीर आरोप केला.

यावेळी रूपाली ठोंबरे यांचा दावा आहे की, मशीनचे नंबर मॅच होत नाहीत. दरम्यान त्यांच्या या आरोपामुळे निकाल प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय़. या आरोपानंतर मतमोजणी तातडीने थांबवण्यात आली असून ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय.

Municipal Elections Result
Municipal Elections Result: मतमोजणीवेळी राडा, EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप, कुठे घडली घटना?

दरम्यान यावेळी रूपाली ठोंबरे आणि गणेश भोकरे प्रचंड आक्रमक झाले असून पोलिसांशी त्यांचा वाद झाला. ठोंबरे आणि भोकरे यांच्यात तसंच अधिकारी-कर्मचाऱ्यांशीही वाद निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण असून निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Municipal Elections Result
Municipal Elections: मतमोजणी सुरु होताच भाजपचे ६ उमेदवार विजयी घोषित; पाहा कुठे लागला निकाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com