Manasvi Choudhary
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.
मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार? याकडे सर्वाचेच लक्ष लागलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी ५२.९४ टक्के मतदान झालं.
मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ जांगावर विजय महत्वाचा आहे.
यानुसार आता सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचे कल यायला हाती आले आहे.
या माहितीनुसार, मुंबईतील 227 वॉर्डपैकी महायुती ५५ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू २९जागांवर आघाडीवर आहे.
स्वबळावर लढलेलेा काँग्रेस पक्ष ०७ जागांवर आघाडीवर आहे.
येथे दिलेली माहिती ही निवडणुक मतमोजणीच्या सुरूवातीच्या कल प्रमाणे आहे.