निर्दोष सुटताच केजरीवाल भावूक; मीडियासमोर ढसाढसा रडले

Arvind Kejriwal Cried After Court Verdict: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मीडियासमोर रस्त्यावरच ढसाढसा रडलेत... मात्र त्यामागचं कारण काय? केजरीवालांबाबत कोर्टानं काय निर्णय दिलाय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Former Delhi Chief Minister Arvind Kejriwal turns emotional after court acquits him in the Delhi Liquor Policy case
Former Delhi Chief Minister Arvind Kejriwal turns emotional after court acquits him in the Delhi Liquor Policy caseSaam Tv
Published On

अरविंद केजरीवाल... दिल्लीचे माजी मुख्यमंत्री..... भर रस्त्यावर मीडियासमोर ओक्साबोक्सी रडलेत...दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या गळ्यात पडून रडलेत...आणि या रडण्यामागचं कारण आहे कोर्टानं अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदियांसह 23 जणांची मद्य घोटाळा प्रकरणात केलेली निर्दोष मुक्तता.. यानंतर केजरीवालांनी सत्य पराभूत होऊ शकत नाही म्हणत भाजपवर हल्लाबोल केलाय..

अरविंद केजरीवाल यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला तो मार्च 2024 मध्ये.... कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना अटक झाली... केजरीवालांचं मुख्यमंत्री पद गेलं... प्रचारासाठी जामीन मिळाला आणि तुरुंगातून सुटका झाली... मात्र केजरीवालांवर मद्य घोटाळ्याचा डाग होता... त्यामुळं सत्ता गेली... निवडणूका संपल्या.... आणि 23 महिन्यांनी केजरीवाल निर्दोष सुटले आणि रडत रडतच मी भ्रष्टाचारी नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय..

मात्र 2 वर्षांपासून ईडी आणि तुरुंगाच्या चक्रव्युहात अडकेल्या केजरीवालांची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने ईडीला जोरदार चपराक लगावलीय... घोटाळ्याचा नुसता आरोप करुन चालणार नाही. त्यासाठी पुरावे द्यावे लागतात... न्यायालय हे आरोपांवर नाही तर भक्कम पुराव्यांवर विश्वास ठेवतं...तपास यंत्रणांनी दिलेले पुरावे कमकुवत आहेत... आता प्रश्न पडतोय की निवडणूका संपल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते निर्दोष सुटत असतील तर तपास यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जातोय का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com