महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची बसला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

rajasthan accident news : राजस्थानमध्ये महामार्गावर अपघाताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने ६ जणांचा मृत्यू झाला.
rajasthan news
rajasthan accidentSaam tv
Published On
Summary

राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात घडलाय

सरवडी गावाजवळ बसला ट्रकची धडक

राजस्थानमधील भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील सरवडी गावात राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात घडला आहे. जोधपूरच्या सांचौरला जाणाऱ्या स्लीपर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, स्लीपर बसचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, कल्याणपूरजवळील सरवडी गावात ही अपघाताची घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर ६ जणांचे मृतदेह शवगृहात ठेवण्यात आलं आहे. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांना पुढील उपचारासाठी जोधपूरच्या माथुर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

rajasthan news
पुणे जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! ९ सराईत गुंडांवर एकाचवेळी मोठी कारवाई

सहा लोकांचा मृत्यू

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरवडी गावात एक बसच्या पुढे जाणाऱ्या ट्रेलर (ट्रक) ने धडक दिल्याने ६ लोकांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर सरवडी गावात स्लीपर बसला ट्र्रकने धडक दिली. अपघातात बसचं प्रचंड नुकसान झालं आहे.

rajasthan news
कल्याणमध्ये कुत्र्याने घेतला आणखी एक बळी; भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, 'बालोतराच्या राष्ट्रीय महामार्गावर झालेला अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य करणे आणि जखमींवर रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. अपघातात मृत पावलेल्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. अपघातातील मृतांच्या आत्म्याला शांती मिळो. तर जखमी व्यक्ती लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. ॐ शांति'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com