कल्याणमध्ये कुत्र्याने घेतला आणखी एक बळी; भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

kalyan stray dog attack : कल्याणमध्ये कुत्र्याने आणखी एक बळी घेतला आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 dog attack
kalyan stray dog attackSaam tv
Published On
Summary

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

मोहने गाळेगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलाभ

भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये कुत्रा चावल्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीपोटी कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. आता पुन्हा कल्याण नजीक मोहने गाळेगाव परिसरात एका सात वर्षांच्या मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मुलाचे नाव खुशील शंकर वाघे असे आहे.

नेमकं काय घडलं?

खुशील हा मोहनेनजीक गाळेगाव परिसरातील कातकरी पाड्यात राहतो. आदिवासी मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचे वडील मोलमजुरी आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खुशीलला भटका कुत्रा चावला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. खुशीलला जेव्हा कुत्रा चावला, त्याचवेळी आणखी एका मुलाला देखील कुत्रा चावला. तो या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 dog attack
कार्यक्रमातून परतत होते, तेवढ्यातच...; ठाकरे गटाच्या खासदाराच्या कारचा अपघात

या घटनेची गंभीर दखल घेत ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात धाव घेतली. नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली. बल्याणी चौक, उंभार्णी, मोहिली, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, आर. एस. टेकडी, मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरुन जाणारे येणारे व्यक्तींवर धाव घेतली जाते. भटक्या कुत्र्यांकडून हल्ला केला जातो. या हल्ल्यात नागरिक जखमी होता.

 dog attack
पुणे जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! ९ सराईत गुंडांवर एकाचवेळी मोठी कारवाई

भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतला जाताे. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी फिरवण्यात यावी. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात यावे, आदी मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com