कार्यक्रमातून परतत होते, तेवढ्यातच...; ठाकरे गटाच्या खासदाराच्या कारचा अपघात

sanjay deshmukh road accident : ठाकरे गटाच्या खासदाराचा कारचा भीषण अपघात झाला आहे. एका कार्यक्रमातून परतताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली
sanjay deshmukh road accident
sanjay deshmukh road accident Saam tv
Published On
Summary

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात

अपघात यवतमाळच्या दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ घडला

अपघातात वाहनाचे नुकसान

संजय राठोड, साम टीव्ही

राज्यात अपघाताचं सत्र सुरू असल्याचे समोर येत आहे. यवतमाळमध्ये गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांचा अपघात झाला. एका ट्रकने खासदारांच्या वाहनाला धडक दिली. यवतमाळ दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. अनेकांनी मदतीसाठी धावाधाव केली.

sanjay deshmukh road accident
संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आता आपल्यात नाही; राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू

वाशिमचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात झाला. यवतमाळ दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ ट्रकने खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला धडक दिली. एका कार्यक्रमातून परतताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात खासदर देशमुख यांच्या वाहनाचे प्रचंड नुकसान झालं आहे.

sanjay deshmukh road accident
राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार ठरला; पक्षाच्या बैठकीतून नावाची अधिकृत घोषणा

अपघातामधून सुदैवाने खासदार संजय देशमुख बचावले. ते आता सुखरूप आहेत. या अपघातात देशमुखांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती हाती आली आहे. त्यांनी अपघातानंतर दिग्रस येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

खासदार संजय देशमुख यांचा अपघात झाल्यानंतर तातडीने स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे आले. अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. पोलीस देखील मदतीला आले. अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर रस्त्यात अडकलेल्या वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. या अपघातात एकूण किती जण जखमी झाले, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com