Sunetra pawar speech
Sunetra pawar Saam tv

संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आता आपल्यात नाही; राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर भाषण करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळाल्या.
Published on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत अध्यक्षपदाची घोषणा

प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

वरिष्ठ नेत्यांकडून प्रस्तावाला अनुमोदन

संजय गडदे, साम टीव्ही

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कार्यकारी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ मंडळींनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच अध्यक्षीय भाषणात सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. अजितदादांची आठवण सांगताना सुनेत्रा पवार या भावुक झाल्या.

सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुनेत्रा पवार यांच्या भाषणातील मुद्दे

महाराष्ट्राचे विकासाचे अजितदादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मात्र ते स्वप्न आपण सर्व जण मिळून पूर्ण करू.

३० जून २०२३ रोजी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

पक्षाची ताकद तिपटीने वाढवली.

अजितदादांच्या काळात महाराष्ट्र लोकसभा, विधानसभा अरुणाचल प्रदेश विधान सभा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद या सर्व निवडणुकात दमदार कामगिरी केली.

आपला पक्ष देशाच्या मातीशी नाते सांगणारा आहे.

Sunetra pawar speech
अन्न आणि औषध विभागातील कारभार पुन्हा चर्चेत; CM फडणवीसांच्या दरबारात पोहोचली तक्रार

27 वर्षांची यशस्वी वाटचाल करत आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचे काम करायचे आहे. अजितदादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलाय.

तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर आणि पाठबळावर ही जबाबदारी मी पार पाडेन. त्यांनी शिव -फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराशी तडजोड केली नाही. तोच विचार पुढे न्यायचा आहे.

समाजातील कोणत्याच घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रीय अध्यक्ष असल्याच्या भावनेने काम करायचं आहे.

Sunetra pawar speech
खोट्या तक्रारी करणाऱ्यांना शिक्षा होणार; सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारे, मानवाधिकार आयोगाला नोटीस

पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवायचे आहे.

ग्रामीण भागात आपली ताकद आहे, आपल्याला शहरात पण पक्ष वाढवायचा आहे. प्रत्येक संकटाला झेलणारा सह्याद्री आपल्यात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com