बारावीच्या परीक्षेत डिजिटल पेपरफुटीचा भंडाफोड; ट्युशन कनेक्शन उघड

Nagpur HSC Chemistry Paper Leak Digital Scam 2026: बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट...मात्र याचं परिक्षेत पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे पेपर फुटीचा डिजिटल स्कॅम उघड झालाय...पेपर फुटीचं ट्युशन कनेक्शन काय आहे? नागपुरात पेपर फुटीचं पेव का फुटलयं...?
Supervisor vigilance exposes digital Class 12 question paper leak racket during Nagpur board examination
Supervisor vigilance exposes digital Class 12 question paper leak racket during Nagpur board examinationSaam Tv
Published On

तारीख 18 फेब्रुवारी 2026...

ठिकाण नागूपरचं सेंट उर्सुला हायस्कूल

12 वीच्या परिक्षेसाठी विद्यार्थीनी परीक्षा केंद्र गाठलं...सकाळी10.50 मिनिटांनी विद्यार्थ्यांना पेपर वाटण्यात आले... 11 वाजता विद्यार्थ्यांनी पेपर लिहायला सुरुवात केली... मात्र पेपर सुरु होऊन काही मिनट झालेली असताना एका विद्यार्थीनीनं पर्यवेक्षकांना वॉशरुममध्ये जाण्याची परवानगी मागितली...

मात्र बराच वेळ विद्यार्थीनी वॉशरुममधून परत न आल्यानं पर्यवेशकांना संशय आला...त्यांनी तिची झडती घेतली... आणि विद्यार्थीनीकडे चक्क स्मार्टफोन सापडला... आणि त्याचं स्मार्टफोनवर उघड झाला पेपरफुटीचा डिजीटल स्कॅम....10.37 मिनटांनी याचं फोनवरील एका व्हॉटसअॅप ग्रुपवर केमिस्टीचा पेपर विद्यार्थ्यांना पुरवला गेल्याचं उघड झालं...

या अगोदर 16 फेब्रुवारीलाही फिजीक्सचा पेपर फुटला होता .... तो ही याचं ग्रुपवरून...त्यामुळे पेपर फूटीचं मोठं रँकेटचं समोर आलंय... त्यानंतर पोलिसांनी या पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास सुरु केला...आरोपीनं फॉरमॅट केलेल्या मोबाईलमधून डेटा रिकव्हर करण्यात आला...

आणि याप्रकरणाची पाळमुळं थेट ट्युशन क्लासेसपर्यंत पोहोचली... एका शिक्षकानं हे पेपर दिनेश कोटांगळे नावाच्या व्यक्तीला पाठवले...आणि दिनेशनं पेपर 'एक्सेलेंट ट्युशन क्लासेस'चा संचालक मुस्तफा खान याला फॉरवर्ड करत पेपर फोडण्याचा हा प्रकार घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आला...पोलिसांनी 7 पैकी 5 आरोपींना ताब्यात घेतलं... त्यात ट्युशन क्लासमधील तिघांचा सहभाग होता.

एकीकडे डिजिटल पद्धतीनं पेपर फुटीचं रॅकेट चालवलं जात असताना दुसरीकडे सीलबंद लिफाफ्यातून विज्ञान शाखेचेच पेपर गायब झाल्यानं एकच खळबळ माजली...मात्र या प्रश्नपत्रिका गोपनीय प्रेसमधून सीलबंद लिफाफ्यात येत असून पर्यवेक्षकांनी यासंदर्भात माहिती दिल्याचं नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितलयं...

आता नागपूरमधील या पेपरफुटीमुळे परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.. याप्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास सुरू असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी हाती लागल्यानंतरच या संपूर्ण रॅकेटचा खरा उलगडा होणार आहे. आता यात मुख्य सूत्रधार लवकर सापडणार की पोलिसांचा तपास व्हॉटस्अॅप मेसेजची साखळी शोधण्यात गुंतून जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com