Maharashtra 12th Board Exams News Saam Tv
महाराष्ट्र

HSC Exam 2025-26 News : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा, १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

Maharashtra 12th Board Exams News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून १५.३२ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. बोर्डाने वेळापत्रक, समुपदेशन व कॉपीमुक्त अभियानाची माहिती दिली आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात आजपासून इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू

  • १५.३२ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले

  • राज्यभर ३३८७ परीक्षा केंद्रांवर आयोजन

  • विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व हेल्पलाईन सुविधा

  • कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके आणि CCTV व्यवस्था

राज्यभरात आजपासून म्हणजेच १० फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक इयत्ता १२ वीची परीक्षा सुरु होत आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,२०,२२९ मुले, ७,१२,२४० मुली व १८ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०,६६४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याध्यर्थ्यांसाठी ३३८७ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.

आजपासून सुरू होणार इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते म्हणाले की, प्रचलित पध्दतीप्रमाणे 'माहिती तंत्रज्ञान' व 'सामान्य ज्ञान' या दोन विषयांची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार असून माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी एकूण २,३६,३२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच सामान्यज्ञान या विषयासाठी एकूण १,७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ व्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून UDISE डेटावरुन कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहु नये यासाठी दिनांक ०३ मार्च पर्यंत आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ व्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राहय धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राहय धरु नये.

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्य मंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु.२.३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना College Login मध्ये ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्रावर विषयासमोर दिनांक व परीक्षा कक्षात उपस्थित राहण्याची वेळ याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र (Hall Ticket) व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन व पालन करावे.

गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.तसेच परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना दिनांक १६/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सवलती देण्यात येत आहेत. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सार्वजनिक परीक्षा निकोप वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळामार्फत राज्यातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना अर्धशासकीय पत्राव्दारे आवाहन करण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी महामंडळामार्फत गाडया नियमित व वेळेत सोडणेबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळ यांना तसेच परीक्षा केंद्रावर अखंडीत विद्युत पुरवठा ठेवण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळ सदस्य आणि जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ज्या परीक्षा केंद्रावर CCTV उपलब्ध आहेत तेथे परीक्षा कॅमेराबध्द घेण्यात येतील तसेच ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडीत स्टाफ कडून गैरप्रकार झाला असेल अशा कर्मचान्यांवर कारवाई करण्यात येईल.फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेचेवेळी राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Tourism : मराठवाड्यात लपलाय वास्तुकलेचा सुंदर नजारा, वाचा 'या' किल्ल्याचा वैभवशाली इतिहास

Maharashtra Politics: ठाकरे भाजपसोबत, तर शिंदे पवारांसोबत जाणार; 'या' नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra Live News Update: ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थगिती

Mumbai fire : घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ... आणि अचानक सर्वकाही संपलं; लेकाच्या लग्नापूर्वीच आईचा दुर्दैवी अंत

Bigg Boss Marathi 6 : "चल आपण लग्न करूया..."; राकेश बापटने बिग बॉसच्या घरात 'या' सदस्याला घातली लग्नाची मागणी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT