Pune : फुटपाथवरच्या डीपी बॉक्सचं कुलूप तोडलं, हाय व्‍होल्‍टेज वायरला हात लावताच भयंकर घडलं!

Pune News : पुण्यातील मित्रमंडळ चौकात पदपथावरील डीपी बॉक्स उघडताना ११ हजार व्होल्टचा शॉक बसून अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून स्वारगेट पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Pune : फुटपाथवरच्या डीपी बॉक्सचं कुलूप तोडलं, हाय व्‍होल्‍टेज वायरला हात लावताच भयंकर घडलं!
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात डीपी बॉक्स उघडताना अज्ञात तरुणाचा मृत्यू

  • ११ हजार व्होल्ट वीजेचा शॉक व स्फोटामुळे दुर्घटना

  • घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; तपास सुरू

  • स्वारगेट पोलिसांकडून आकस्मात मृत्यूची नोंद

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात पदपथावर डीपी बॉक्सचे कुलूप तोडून अकरा हजार व्‍होल्‍टेज क्षमतेचा वीज असलेल्‍या, वायरला हात लावल्‍याने शाॅक बसून ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मित्र मंडळ चौकात घडली. मृत्‍यू झालेल्‍या तरुणाची ओळख अद्यापही पटलेली नाही. याबाबत स्‍वारगेट पोलिस ठाण्‍यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे.

स्‍वारगेट पोलिस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संबंधित व्‍यक्‍ती ही रस्‍त्‍यावर राहणारी व अज्ञात असून त्‍याची ओळख पटलेली नाही. मित्रमंडळ चौकात महापालिकेच्‍या दवाखान्‍याच्‍या बाहेरील बाजूस पदपथावर हा डीपी बॉक्‍स बसवलेला असून त्‍याला कुलूप लावलेले होते.

Pune : फुटपाथवरच्या डीपी बॉक्सचं कुलूप तोडलं, हाय व्‍होल्‍टेज वायरला हात लावताच भयंकर घडलं!
Pune Crime News : पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू होता भयंकर प्रकार; धाड टाकल्यानंतर रूममधलं दृश्य बघून सगळेच हादरले

या अज्ञात व्‍यक्‍तीने सकाळी सातच्‍या सुमारास त्‍या डीपी बॉक्‍सचे कुलूप सात ते आठ मिनिटे प्रयत्‍न करून तोडले. त्यांनतर बॉक्‍सचे हँडल त्‍याने हाताने उघडले आणि त्‍याने उच्‍च विद्यूत तारेला स्‍पर्श केला. त्‍यावेळी तेथे मोठा स्फोट होऊन, तो व्‍यक्‍ती दूर फेकला गेला आणि त्‍याचा त्‍यामध्‍ये मृत्‍यू झाला.

Pune : फुटपाथवरच्या डीपी बॉक्सचं कुलूप तोडलं, हाय व्‍होल्‍टेज वायरला हात लावताच भयंकर घडलं!
KDMC News : अरेरे! कल्याण डोंबिवली महापौर बंगल्याची वाईट अवस्था; केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी

यामध्‍ये तो फारसा भाजला नसून फेकला गेल्‍याने डोक्‍याला जबर मार लागला. यानंतर स्‍वारगेट पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत त्‍याला ससून रुग्‍णालयात शवविच्‍छेदनासाठी दाखल केले. दरम्यान, या व्‍यक्‍तीचा यामागील काय उद्देश होता हे माहित नसून ही घटना सीसीटीव्‍ही मध्‍ये कैद झाल्‍याचे निरीक्षक निकम यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com