1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज १ जीबी डेटा, १०० SMS; पण ही एक अट...BSNL ची जबरदस्त ऑफर

BSNL Rs 1 Recharge Plan With Unlimited Calls And 1GB Daily Data: BSNL चा 1 रुपयांचा FRC प्लॅन पुन्हा उपलब्ध झाला आहे. नवीन ग्राहकांना 24 दिवस रोज 1GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळणार आहेत. मात्र, या ऑफरसाठी एक महत्त्वाची अट आहे.
BSNL RS 1 RECHARGE PLAN: 1GB DATA, UNLIMITED CALLS & 100 SMS
BSNL RS 1 RECHARGE PLAN: 1GB DATA, UNLIMITED CALLS & 100 SMSsaam tv
Published On

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने आपल्या ग्राहकांसाठी 1 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन पुन्हा लॉंच केला आहे. काही काळासाठी पोर्टफोलिओमधून काढण्यात आलेला हा प्लॅन आता सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये नव्या ग्राहकांसाठी पुन्हा उपलब्ध करण्यात आला आहे. या रिचार्जमध्ये 24 दिवसांची सर्व्हिस व्हॅलीडिटी, इंटरनेट, SMS आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग अशा सुविधा मिळत आहेत. जर तुम्ही BSNL चे नवीन सिम कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर जास्त महिन्यांचा प्लॅन घेण्यापूर्वी या ऑफरच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात BSNL ची सेवा वापरुन पाहता येऊ शकते.

BSNL RS 1 RECHARGE PLAN: 1GB DATA, UNLIMITED CALLS & 100 SMS
मोबाईल रिचार्ज महागणार! दर १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; पाहा तुमच्या खिशावर किती भार पडणार?

BSNL च्या 1 रुपयांच्या प्लॅनचा फायदा कोणाला मिळणार?

BSNL च्या या 1 रुपयांच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. हा प्लॅन केवळ BSNL च्या नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा प्लॅन FRC म्हणजेच First Recharge Coupon म्हणून करण्यात आला आहे. याचा अर्थ नवीन BSNL सिम खरेदी केल्यानंतर ग्राहकाला हा प्लॅन पहिला रिचार्ज म्हणून वापरावा लागेल. BSNL चे आताचे ग्राहक किंवा जुने कनेक्शन वापरणाऱ्या ग्राहकांना या 1 रुपयांच्या प्लॅनचा लाभ घेता येणार नाही.

BSNL RS 1 RECHARGE PLAN: 1GB DATA, UNLIMITED CALLS & 100 SMS
Jio Recharge: खुशखबर! Jio च्या या प्लॅनमध्ये मिळेल 20GB डेटा मोफत अन् इतक्या दिवसांची वैधता

24 दिवसांची व्हॅलिडिटी आणि रोज 1GB डेटा

BSNL च्या या 1 रुपयांच्या FRC प्लॅनमध्ये 24 दिवस वापरू शकतात. या संपूर्ण कालावधीत ग्राहकांना दररोज 1GB मोबाइल डेटा दिला जातो. म्हणजेच 24 दिवसांत एकूण 24GB इंटरनेट मिळतं. तसेच ग्राहकांना संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा दिली जाते. त्यामुळे 24 दिवसांत एकूण 2,400 SMS वापरता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com