मोबाईल रिचार्ज महागणार! दर १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; पाहा तुमच्या खिशावर किती भार पडणार?

Mobile recharge hike : देशातील मोबाईल ग्राहकांना लवकरच रिचार्जसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्या १२ ते १५ टक्क्यांनी टॅरिफ वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
mobile recharge
mobile recharge expensive Saam tv
Published On

Mobile Recharge Price Hike : देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्सना पुढील काही महिन्यांत मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यानी रिचार्ज प्लॅन्स (टॅरिफ) १२ ते १५ टक्क्यांनी वाढवण्याची तयारी केली आहे. 'सेंट्रम इन्स्टिट्यूशन रिसर्च' या फर्मने आपल्या नवीन अहवालात हा दावा केला आहे. पुढील काही महिन्यांत ही दरवाढ होऊ शकते असे सांगण्यात आले. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाच्या सर्व ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे.

दर वाढवण्याचे कारण काय?

'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्यांना प्रति ग्राहक मिळणारे सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवायचे आहे. कंपन्यांचा महसूल आणि नफा वाढवण्यासाठी ही दरकाढ केली जाण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट भार सर्वसामान्य मोबाईल ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

mobile recharge
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ, जाणून घ्या किती मिळणार फायदा?

२ वर्षांनंतर पुन्हा दरवाढ

यापूर्वी जुलै २०२४ मध्ये एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या तिन्ही मोठ्या कंपन्यांनी रिचार्जचे दर २५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. आता साधारण दोन वर्षांनंतर कंपन्या पुन्हा एकदा ग्राहकांना हा झटका देण्याच्या तयारीत आहेत. या संभाव्य दरवाढीबाबत अद्याप टेलिकॉम कंपन्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांनी यापूर्वीच मोबाईल सेवांचे दर वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

mobile recharge
Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

ग्राहकांवर नेमका किती फरक पडेल?

सर्वसामान्यांना टक्केवारीपेक्षा खिशावर किती भार पडणार? हे जाणून घेण्यात जास्त रस असतो. जर सध्या एखाद्या ग्राहकाचा महिन्याचा रिचार्ज ३०० रुपये असेल, तर १५% दरवाढीनंतर तो साधारण ३४५ रुपये होईल. म्हणजेच दरमहा ४५ ते ५० रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड बसेल.

mobile recharge
Income Tax Return: करदात्यांसाठी मोठी बातमी! ITR भरला पण हे काम विसरलात? लगेचच पूर्ण करा प्रोसेस, शेवटची तारिख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com