

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतनाबद्दल चर्चा सुरु आहेत. विविध भागातल्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांनी आयोगाकडे अनेक मागण्या केल्या होत्या. त्याच्या शिफारशींची कर्मचारी आतुरतेने वाट पाहतायते. दरम्यान जुलै २०२६ पासून कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे महागाई भत्त्यात (DA Hike)मध्ये वाढ होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
श्रम ब्युरोकडून जाहीर करण्यात आलेल्या महागाई वाढली आहे. त्यानुसार जुलै २०२६ पासून महागाई भत्त्यात सुमारे ३ टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ६० टक्के डीए मिळत असून तो ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ही वाढ लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या मासिक पगारात थेट वाढ होईल. पण याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.
बऱ्याच कर्मचाऱ्यांमध्ये जुलै महिन्यापासून बेसिक पगारात वाढ होण्याची असली तरी सध्या अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. जुलैमध्ये अपेक्षित असलेली वाढ ही फक्त महागाई भत्त्यातली आहे.आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अजुनही तयार झालेल्या नाहीत. कारण विविध आयोगातल्या कर्मचाऱ्यांकडून सूचना आणि मागण्या येत आहेत.
तसेच आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत चर्चा सुरु आहे. काही मागण्यांमध्ये फिटमेंट फॅक्टर २.० ते २.८६ दरम्यान ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचारी संघटनांकडून यापेक्षा अधिक फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. जर सरकारने उच्च फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर बेसिक सॅलरीत मोठी वाढ होऊ शकते. पण कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे संभाव्य डीए वाढ आहे. त्याने महागाईत कर्मचाऱ्यांना खर्चाचा ताण येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.