भीमाशंकरमध्ये गर्दी व्यवस्थापनाचा फज्जा! एका बाजूला ट्रॅफिक जाम, दुसरीकडे पोलिस-भाविकांमध्ये हाणामारी

Bhimashankar Witnesses Massive Traffic jam : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे भीमाशंकरला भाविकांची मोठी गर्दी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडीदरम्यान पोलीस आणि काही भाविकांमध्ये वाद होतोय.
Bhimashankar Witnesses Massive Traffic jam
Traffic Nightmare At Bhimashankar, Police-Pilgrim Clash Sparks Tensionsaam tv
Published On
Summary
  • स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली.

  • भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

  • वाहतूक आणि पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलीस आणि काही भाविकांमध्ये वाद झाला.

रोहिदास गडगे, साम प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिन आणि सलग सुट्ट्यांमुळे भीमाशंकरला सकाळपासूनच भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी झालीय त्यातच रात्रीच्या वेळीही भिमाशंकरला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी कायम आहे. वाहतूक कोंडीत हैरान झालेले प्रवाशी आणि वाहतूक पोलिसांमध्ये हाणामारी झाली.

Bhimashankar Witnesses Massive Traffic jam
फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

एका बाजूला वाहतूक कोंडीने भाविक हैराण झाले असताना दुसरीकडे पोलीस आणि भाविकांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे पर्यवसान चक्क हाणामारीत झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भीमाशंकरकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाऊस आणि धुक्यात भाविक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.याचदरम्यान वाहतूक आणि पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलीस आणि काही भाविकांमध्ये वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारी झाल्याने परिस्थिती चिघळली.

Bhimashankar Witnesses Massive Traffic jam
Husband - Wife : बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात?

भीमाशंकरकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाऊस आणि धुक्यात भाविक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.याचदरम्यान वाहतूक आणि पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलीस आणि काही भाविकांमध्ये वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारी झाल्याने परिस्थिती चिघळली.

भीमाशंकरला रात्रीही वाहतूक कोंडी पाऊस धुक्यात भाविकांना मनस्ताप

रात्रीच्या वेळीही भिमाशंकरला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी कायम असुन पाऊस, दाट धुकं आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक भीमाशंकरकडे दाखल झाले आहेत. मात्र वाढलेली गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाल्याने रात्रीही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यावर कमी दृश्यमानता, दाट धुकं आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांचीही मोठी कसरत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com