Pune ZP Election Result : कारेगावच्या निर्मला नवलेंचा झेडपीत पराभव, भाजपच्या शिलेदाराने २७०० मतांनी केली मात

Pune Zilla Parishad Election Result : पुणे जिल्हा परिषद निवडणुकांत शिरूरमध्ये भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या निर्मला नवले यांचा २७०० मतांनी पराभव झाला आहे. झेडपी निकालांचे सविस्तर अपडेट वाचा.
Pune ZP Election Result : कारेगावच्या निर्मला नवलेंचा झेडपीत पराभव, भाजपच्या शिलेदाराने २७०० मतांनी केली मात
Pune Zilla Parishad Election ResultSaam Tv
Published On
Summary
  • पुणे जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर

  • शिरूरमध्ये भाजपाची सरशी, राष्ट्रवादीला धक्का

  • सोशल मीडिया स्टार निर्मला नवले यांचा पराभव

  • मनीषा पाचंगे यांनी २७०० मतांनी विजय मिळवला

राज्यात ठिकठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागला आहे. ७ जानेवारी रोजी या निवडणूका पार पडल्या होत्या. या निवडणुकांचा निकाल सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाला आहे. पुण्यात अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. पुण्यातील शिरूर येथे भाजपाचे तीन शिलेदार विजयी झाले असून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे.

कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा २७०० मतांनी पराभव केला आहे.

Pune ZP Election Result : कारेगावच्या निर्मला नवलेंचा झेडपीत पराभव, भाजपच्या शिलेदाराने २७०० मतांनी केली मात
Kalyan : ठाकरे गटाचे ‘बेपत्ता’ नगरसेवक शिंदेंसेनेच्या मंचावर, कुठे होते? विचारताच काढला पळ, कल्याणच्या राजकारणात नेमकं काय घडतेय?

निर्मला नवले या सोशल मीडियावर फेमस आहेत. त्यांचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांचा रेज रोव्हर मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा व्हिडीओ बराच गाजला होता. आयटी इंजीनिअर असलेल्या निर्मला या सरपंच झाल्यानंतर उच्चशिक्षित सरपंच असे त्यांचे कौतुक केले जात होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्या जिंकूनही आल्या होत्या. मात्र यावेळेस त्यांचा पराभव होऊन जिल्हा परिषदेची संधी हुकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com