Akola Fake Baba Video Saam Tv
महाराष्ट्र

Akola Bhondubaba: महाराष्ट्राला अंधश्रद्धेचा विळखा, भोंदूबाबाचा चिमुकल्यांशी जीवघेणा खेळ; संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Akola Fake Baba Video: अकोल्यामध्ये भोंदूबाबाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा भोंदूबाबा दादाच्या सहाय्याने बाळाला उचलतो. चिमुकल्यासोबत जीवघेणा खेळ करणाऱ्या या भोंदूबाबाविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

Priya More

Summary -

  • अकोल्यातील निंबा गावात भोंदूबाबा चर्चेत

  • अकोल्यात अंधश्रद्धेचा प्रकार उघड

  • भोंदूबाबाने चिमुकल्यांना दाताने उचलले

  • घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्रात भोंदुबाबांनी पार हैदोस घातलाय. अशातच अकोल्यातील एकाच गावात तब्बल 4 भोंदूबाबा आपला दरबार भरवत असल्याचं समोर आलयं. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणारे हे भोंदूबाबा लोकांच्या श्रद्धेचा कसा गैरफायदा घेत होते? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

महाराष्ट्रात भोंदूबाबांनी कहर केलाय.या भोदूबाबांच्या पाया पडणारे तर आहेतच. पण या भोंदूबाबाच्या पायावर पोटच्या लहानग्यांना टाकणाऱ्यांची ही कमी नाही. हा व्हीडीओ नीट पाहा. चिमुकल्यांशी जीवघेणा खेळ करणारा हा भोंदूबाबा आपल्या दातानं या बाळाला उचलताना दिसतोय. बाळ जोरजोरात रडत असताना त्याचे अघोरी प्रकार सुरूच आहेत.

मुर्तीजापुर तालुक्यातल्या निंबा गावातील मधु महाराज आणि चेतन महाराज यांच्याकडून हा अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचा आरोप करण्यात येतोय. लहान मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांना या भोंदूबाबांकडे घेऊन जातात. त्यानंतर ढोलकी आणि संबळाच्या तालावर हा बाबा लहान मुलांना आपल्या दातानं उचलून थिरकतो. निंबा गावात तब्बल चार महाराजांचे दरबार भरतात. या दरबारात नेमकं काय सुरु असतं पाहूयात...

राजेंद्र डहाके हे चार बाबा आपला दरबार भरवतात. त्यातील चेतन मुळे उर्फ गुलालशेष महाराजांच्या दरबारात लहान मुलांना दाताने उचलले, खिळ्यांच्या आसनावर बसणे यासोबतच अनेक अघोरी प्रकार केले जातात. दहावी नापास असलेला हा महाराज गेल्या दहा वर्षांपासून दरबार भरतो. दरबारात लिंबू फेकणे, कोडं सोडवणे, अनेक व्याधी, रोग आणि कौटुंबिक समस्यांवर उपचाराचा दावा ही महाराजांकडून केला जातो.

दुसरीकडे या अंधश्रद्धेविरोधात अंनिसनं आक्रमक पवित्रा घेतला. तर हा व्हीडीओ समोर आल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी चेतन महाराज आणि मधु महाराज यांच्यासह आणखी दोन भोंदूबाबांना अंधश्रद्धा पसरवण्यासंदर्भात केवळ नोटीस बजावलीय.

खर तर कायद्याने कोणत्याही वैद्यकीय आजारावर अघोरी पद्धतीने उपचाराचा दावा करणे हा गुन्हा आहे. तरीही, राज्यात खुलेआम हा प्रकार सुरू असतो. भक्ती आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा जेव्हा ओलांडली जाते, तेव्हा अशा अघोरी प्रथा जन्माला येतात. राज्यात खरातसारखी प्रकरणही घडत असतात..त्यामुळेच या भोंदूना कायद्याचा बडगा तर दाखवला पाहिजेच पण अशा भोंदू बाबा-बुवांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यांनीही थोड तरी भान राखणं गरजेच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT