Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Fake Baba Viral Video: राज्यात भोंदूबाबांची अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहे. अशामध्ये एका बाबाचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दारू सोडायला गेलेल्या एका व्यक्तीला बाबा बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे

दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तथाकथित बाबाकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचे नेमके ठिकाण आणि वेळ अद्याप स्पष्ट झालेली नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक साधूबाबा दारू सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला हाताने मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्यक्ती बाबाच्या पाया पडत असतानाही त्याला वारंवार चोप दिला जातो. यावेळी आजूबाजूला उपस्थित लोक केवळ पाहत उभे असल्याचेही दिसते. दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com