

झाडग्राममध्ये मोदींचा झालमुडी खातानाचा व्हिडिओ व्हायरल
ताफा थांबवून साध्या दुकानात भेट
विक्रेत्याशी साधा संवाद चर्चेत
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभांचा धुरळा उडाला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठी फौज मैदानात उतरवली आहे. स्वत: पंतप्रधान मोदीही प्रचार करण्यात व्यस्त आहेत. प्रचाराच्या धावपळी दरम्यान पंतप्रधान मोदींनी झाडग्राम येथे भेळ खाण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झालमुडी खाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबवून सुरक्षेची पर्वा न करत एका साध्या दुकानात गेले. त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान झालमुडी खाताना पंतप्रधान मोदींनी भेळवाल्या दुकानदाराशी गप्पा देखील केल्या. त्यांच्या या चर्चेचा व्हिडिओ सोश मीडियावर खूप व्हायरल होतोय. परंतु त्याचवेळी अनेकांना प्रश्न पडला आहे, तो म्हणजे पंतप्रधान मोदींनी भेळवाल्याला कोणते आणि किती प्रश्न विचारले.
झाडग्राममध्ये निवडणूक रॅली घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुरक्षा सोडून एका लहानशा झालमुडी दुकानात गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पहिलाच प्रश्न केला तो, "भाऊ, तुमची झालमुडी आम्हाला द्या ना? कितीला आहे?" दुकानदाराने उत्तर दिले, "तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला खाऊ घालीन."
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी विचारलं चांगल्या झालमुडीची किंमत किती असते? त्यावर दुकानदार सांगतो, १०, २० आणि ३० रुपये. "तुमच्याकडे जे काही आहे ते बनवा,असं सांगताना पंतप्रधान आपल्या खिशातून पैसे काढले. हे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मोदींच्या हातात ५० रुपयांची एक नोट, २० रुपयांच्या दोन नोटा आणि १० रुपयांची एक नोट दिसत आहे. पंतप्रधान मोदी १० रुपये काढून दुकानदाराला देतात. परंतु दुकानदार पैसे घेण्यास नकार देतो, "तुम्ही आलात तेच पुरेसं आहे." त्यावर मोदी उत्तर देतात, "नाही दादा, तसं नाही." मग दुकानदार आणखी काहीतरी बोलून ते १० रुपये परत कॅश बॉक्समध्ये ठेवतो.
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भेळवाल्याला काही प्रश्न केली आहेत. त्याची माहिती खुद्द दुकानदार विक्रम शॉ यांनी.
पंतप्रधान मोदी माझ्या दुकानात येतील आणि झालमुडी खातील याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु ते आले ते खूप भारी वाटतंय. मात्र त्याचा ऑट्रोग्राप घेऊ शकलो नाही, याचं दु:ख आणि पश्चाताप होत असल्याचं विक्रम यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी आधी दुकानदाराला त्याचे माझं नाव विचारले.
कसे आहात आहात, झालमुडी बनवा
झालमुडी खाल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दुकानदारच्या आई-वडीलांचे नाव विचारले.
कुठे राहतात? बिहारमध्ये कुठून
शिक्षण किती झाले आहे?
दुकानातून किती कमाई होते?
घरात किती सदस्य आहेत?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.