Maharashtra Rain Updates Maharashtra Rain Live News and Updates in Marathi (20 July)
महाराष्ट्र

Maharashtra School Closed: आजचा दिवस पावसाचा! पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यातील शाळा बंद, प्रशासन अलर्ट; वाचा सविस्तर

Maharashtra Heavy Rain School, Collage, Road Closed Latest Update: राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून पुणे, पिंपरी पिंचवड शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Gangappa Pujari

मुंबई, पुण्यासह रायगड, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून पुणे, पिंपरी पिंचवड शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी

रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून सावित्री, कुंडलिका आणि अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये आज बंद राहणार आहेत. तसेच पालघरच्या वाडा विक्रमगड भागात आज मुसळधार पावसाची शक्यता असून वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळां महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

पुणे, पिंपरी, चिंचवडमध्ये शाळा बंद..

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत. या दमदार पावसामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील तसेच पुणे, शहरासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

घाटमाथ्यांवरील शाळा बंद!

मागच्या २४ तासांपासुन घाटमाथ्यावर पाऊसाची संततधार सुरु असुन जिल्हा प्रशासनाकडुन सतर्कतेचा इशारा देत खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आलीय. तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील घाटामाथ्यावर पाऊसाची संततधार सुरु असल्याने घाटमाथ्यावरील गावच्या शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

लोणावळ्यातही शाळा बंद!

दरम्यान, लोणावळ्यातही पावसाने तुफान बॅटिंग केली असून उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. आज आणि उद्या लोणावळा नगर परिषद क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभाागाने पुढील दोन दिवस लोणावळ्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT